दालफ्राय, डाळ भात, वरण भात… भाजीत डाळ, आमटीत डाळ. हे भारतीयांच्या जेवणातील आजपर्यंतचे दिसणारे सर्वसामान्य चित्र. तूरडाळीत (Turdal) कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, झिंक, तांबे, सेलेनियम, मॅंगनीज आणि प्रथिने हे घटक आढळतात. त्यामुळे आजारी माणसालाही तूरडाळीचे वरण आणि भात हे आवश्य खावे असा सल्ला दिला जातो. पण आता तुमच्या आमच्या जेवणातून पुढील वर्षभरासाठी तरी […]
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आमदार अतुल बेनके आणि शिवसेना नेते, माजी आमदार शरद सोनवणे यांच्या लढ्याला मोठे यश आले आहे. जुन्नर तालुक्यातील बिबट सफारी प्रकल्पास राज्य मंत्रिमंडळाने आज (5 फेब्रुवारी) मंजुरी दिली आहे. जुन्नर परिसरातील बिबट्यांची लक्षणीय संख्या पर्यटनवाढीसाठी उपयोगी असल्याचा दावा करत जुन्नरमध्ये बिबट सफारी सुरु करण्यासाठी ते आग्रही होते. त्यादृष्टीने सातत्याने […]
चंदीगड : व्हिडीओमध्ये आम्ही जे काही बघितले ती लोकशाहीची थट्टा आहे. आम्ही पुरते हादरुन गेलो आहोत. आम्ही लोकशाहीची अशी हत्या होऊ देऊ शकत नाही, असे निरीक्षण नोंदवर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) चंदीगड महापालिकेची सात फेब्रुवारी रोजी होणारी पहिली बैठक अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय नवीन महापौरांच्या कामकाजावरही तूर्तास बंधने घालण्यात आली आहेत. […]
पुणे : देशात 15 राज्यांमधील 56 जागांसाठी राज्यसभेची (RajyaSabha Election) निवडणूक जाहीर झाली आहे. लोकसभेपूर्वी (Lok Sabha Election 2024) होणाऱ्या या निवडणुका आगामी राजकारणाच्या दृष्टीने महत्वाच्या मानल्या जात आहेत. महाराष्ट्रातही सहा जागांसाठी निवडणूक घोषित झाली आहे. मात्र, निवडणूक लढवण्यासाठी पुरेसे संख्याबळ आमच्या पक्षाकडे नाही. त्यामुळे ही निवडणूक लढण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष […]
गुजरात पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने काल (रविवारी) मुंबईतील इस्लामिक धर्मोपदेशक मौलाना मुफ्ती सलमान अझहरी (Maulana Mufti Salman Azhari) यांना अटक केली. गुजरातमधील (Gujrat) जुनागढ येथे प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल त्यांना अटक केली आहे. अटक करुन गुजरातला घेऊन जाण्यापूर्वी त्यांना घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या तात्काळ सुटकेची मागणी करत हजारो लोक पोलिस स्टेशनबाहेर जमले होते. […]
नवी दिल्ली : देशभरातील विद्यापीठे, शाळा-कॉलेज आणि विविध स्पर्धा परीक्षांमध्ये होणारे गैरव्यवहार हा कायमच चर्चेचा आणि चिंतेचा विषय असतो. विद्यार्थी वर्षानुवर्षे तयारी करुन या परिक्षांना सामोरे जात असतात. मात्र गैरव्यवहारांमुळे ते संधीपासून वंचित राहतात. पण आता या गैरव्यवहाराला चाप बसणार आहे. मोदी सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात परिक्षेतील गैरव्यवहारांना रोखण्यासाठी नवीन कायदा आणला आहे. (Modi government has […]
मागच्या तीन दिवसांपासून राज्यात दोन गायकवाडांची चर्चा आहे. एक भाजप आमदार गणपत गायकवाड (Gantap Gaikwad) यांची. ज्यांनी थेट उल्हासनगरच्या पोलीस स्टेशनमध्येच फायरिंग केली आणि दुसरे महेश गायकवाड (Mahesh Gaikwad). ज्यांच्यावर फायरिंग झाली. जमिनीच्या वादातून ही घटना घडल्याचे सांगितलं जात आहे. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. एक सत्ताधारी पक्षाचा आमदार, ते देखील पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार […]
पुणे : अयोध्येनंतर आता काशी (Kashi) आणि मथुरा (Mathura) ही धार्मिक स्थळे हिंदुंना शांतेमध्ये मिळाली पाहिजेत. आम्हाला इथल्या वास्तू मिळू द्या, त्यानंतर अन्य कोणत्याही मशिदींकडे बघणारच नाही. कारण आम्हाला भविष्यात जगायचे आहे. भुतकाळात जाण्याची आणि जगण्याची आमची इच्छा नाही. देशाचे भविष्य चांगले व्हावे असे वाटत असेल तर समजुतीने तीन ठिकाणे आम्हाला द्या. आम्ही सगळ्या बाकीच्या […]
मुंबई : भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांच्या समर्थनार्थ चोपडा न्यायालयाबाहेर घोषणाबाजी करणारे 40 कार्यकर्ते अडचणीत आले आहेत. मनाई आदेशाचे उल्लंघन करुन एकत्र येत घोषणाबाजी केल्याने भाजपच्या (BJP) 40 कार्यकर्त्यांवर उल्हासनगरमधील सेंट्रल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात पुरुष आणि काही महिला कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. (A case has been registered against 40 […]
कल्याण : या भागातील धंदे सांभाळण्यासाठी किंवा त्या धंद्यांना संरक्षण देण्यासाठी शिवसेना (ShivSena) खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी जी काही खास माणसे आपल्या हाताशी बाळगली आहेत, त्यापैकी एक महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) आहेत, असा गंभीर आरोप शिवसेना (UBT) नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danave) यांनी केला. ते छत्रपती संभाजीनगर येथे […]