कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
इंडिया आघाडीला (India Alliance) 233 जागा मिळाल्यानंतर आज दिल्लीत इंडिया आघाडीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जागा वाटपाचा केंद्रबिंदू हा सर्व्हे होता. सर्व्हेमुळे ओव्हर कॉन्फीडन्स आला आणि आमचा पराभव झाला. - संजय शिरसाट
मला माझा पराभव मान्य आहे. पराभवही सन्मानाने स्वीकारला पाहिजे, अशी शिकवण आम्हाला मुंडे साहेबांनी दिली - पंकजा मुंडे
राज्यातील भाजपची कामगिरी अत्यंत सुमार झालीये, याची जाणीव फडणवीसांना झाली असून ते आता केंद्रीय नेतृत्वाकडून कारवाई होण्यापूर्वीच राजीनामा देण्याचे नाटक करत आहेत, अशी टीका लोंढे यांनी केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) प्रतिक्रिया दिली.
भाजपने सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) राष्ट्रपती भवनात दाखल झाले आहेत.
चंद्रकांत खैरेंनी या पराभवाचं खापर अंबादास दानवे यांच्यावर फोडलं आहे. पक्षातीला काही लोकच आपल्या पराभवाला जबाबदार असल्याचं खैरे म्हणाले.
वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र उमेदवार लढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, एकाही मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना बाजी मारली नाही.
संजय देशमुखांना (Sanjay Deshmukh) 594807 इतकी मते मिळाली असून त्यांनी राजश्री पाटलांचा तब्बल 94 हजार 473 मतांनी पराभव केला.
राज्यात महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) 30 जागा मिळाल्या आहेत. तर महायुतीला 17 जागांवर समाधान मानावं लागलं.