कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
मुंबई : तेलंगणा विधानसभा निवडणुकीत (Telangana Assembly Elections) जनतेने काँग्रेस (Congress) पक्षाला भरघोस मतदान करून विजयी केले आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांची अपार मेहनत व जनतेचा विश्वास यामुळेच काँग्रेसला तेलंगणात मोठे यश मिळाले आहे. कर्नाटकनंतर दक्षिण भारतातील दुसऱ्या महत्वाच्या राज्यात काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे तर दक्षिण भारतातून भारतीय जनता पक्षाला जनतेने दारे बंद करून भाजपाच्या धर्मांध […]
Chhattisgarh Assembly Election 2023 : निवडणुका झालेल्या पाच राज्यांपैकी छत्तीसगडमध्ये काँग्रेसचेच सरकार येणार असल्याचे चित्र सुरुवातीपासूनच होते. हाच कल जनमत तसेच निवडणुकीनंतरच्या चाचण्यांमध्ये दिसून आला. पण आता निकाल धक्कादायक लागला. सत्ताविरोधी लाटेत काँग्रेसचे (Congress) अनेक उमेदवार पराभूत झाले. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत 90 जागांपैकी भारतीय जनता पक्ष 55 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस 32 जागांवर समाधान […]
election result 2023 : विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला होता. यानंतर राजस्थानमधील बायतू येथे एका निवडणूक सभेत काँग्रेस नेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) पनौती म्हणत त्यांच्यावर टीका केली होती. दरम्यान, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपने दमदार कामगिरी केली आहे. राजस्थान, छत्तीसगड ही राज्य काँग्रेसच्या हातातून […]
अहमदनगर – चार राज्यांच्या विधानसभांचे निवडणुकीचे निकाल समोर आले असून यामध्ये भाजपची तीन ठिकाणी विजयाकडे वाटचाल आहे. तर काँग्रेसला केवळ एकच ठिकाणी समाधान मानावे लागले. दरम्यान निकालापूर्वीच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ईव्हीएम चा प्रश्न उपस्थित केला. यावर खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी उत्तर दिले. संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मनावरती आधीच परिणाम […]
Dinesh Phadnis : सीआयडी या हिट टीव्ही शोमध्ये फ्रेडरिक ही भूमिका साकारून प्रसिद्ध झालेले अभिनेता दिनेश फडणीस (Dinesh Phadnis) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं वृत्त आहे. त्यामुळं त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. फ्रेडरिक या भूमिकेमुळं दिनेश यांनी लाखो लोकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. मात्र, आता त्यांची […]
Shambhuraj Desai on Ajit Pawar : देशात आगामी काळात लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) होत आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. भाजपने लोकसभेच्या ४५ हून अधिक जागा राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सहकार्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय केला. जागावाटपाचा फॉर्म्युलाही ठरला असल्याची चर्चा आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काल कर्जत येथील कार्यकर्त्यांच्या शिबिरात […]
Fake Note : देशात बनावट नोटांचा (fake notes) सुळसुळाट सुरूच असल्यानं बनावट नोटांचं रॅकेट उद्धवस्त करण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (National Investigation Agency) आज देशभरात छापेमारी केली. तपास संस्थेने चार राज्यांमध्ये छापे टाकून बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि बिहारमध्ये झालेल्या कारवाईत 500, 200 आणि 100 रुपयांच्या बनावट नोटांसह […]
मुंबई : ट्रॅफिक सिग्नलवर पोलिसांकडून वसुली केल्याचा अनुभव अनेकांना आहे. मात्र, आज याचा खुद्द राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनाही आला. त्यानंतर त्यांनी वाहतुक पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या वसुलीची आकडेवारीच समोर आणली होती. प्रत्येक चौकाचौकात वाहतूक पोलिसांना (Traffic Police) वसुलीचे टार्गेट देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. ट्रिपल इंजिन, ट्रिपल वसुली, असं म्हणत त्यांनी सरकारवर ताशेरे […]
जालना : जालन्यात सध्या राजकीय वाद विकोपाला गेल्याचं दिसून येत आहे. आज दुपारी माजी आरोग्य मंत्री आणि शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या गाडीवर दगडफेक झाली होती. त्यानंतर आता माजी मंत्री बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांच्या घरावर अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. अचानक आलेल्या अज्ञातांच्या जमावाने लोणीकर व त्यांच्या भावांच्या […]
नवी दिल्ली : मध्य प्रदेश, राजस्थानसह 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल उद्या म्हणजेच रविवार 3 डिसेंबर रोजी स्पष्ट होतील. मात्र, याआधी आलेल्या एक्झिट पोलच्या अंदाजाने सर्वच पक्षांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. दरम्यान, निवडणूक निकालांपूर्वीच, काँग्रेस (Congress) अलर्ट मोडमध्ये आली आहे. पक्षाचे ‘संकटमोचक ‘ म्हणून ओळखले जाणारे डीके शिवकुमार (DK Shivakumar) यांनाही आता पक्षाने सक्रीय केलं. […]