अमरावती : आचारसहिता भंग केल्याने भाजप आमदार रणजीत पाटील (Ranjit Patil ) यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानपरिषेदच्या ५ जागांसाठी आज मतदान होत आहे. पाचही मतदारसंघात यंदा चुरशीची लढत आहे. अशातच अमरावती (Amravati) पदवीधर मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार रणजीत पाटील यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा आरोप करत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार रवी […]
पुणे : शाहू-फुले-आंबेडकर-शिवाजी महाराज-सावित्रीबाई फुले हेच माझं दैवत आहेत. कोणी कितीही धर्माचे गाजर दाखवून धर्माच्या नावाखाली हरामखोरी करण्याचा प्रयत्न केला. तरी या भारताच्या संविधानाला धक्का सुद्धा लागू शकत नाही. सध्या अत्यंत चुकीच्या पद्धतीने आपल्या महापुरुषांवर बोलले जात आहे. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक आहे. महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील भिक मागणारे नव्हते. जी लोक असं म्हणत […]
मुंबई : नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi) आणि अमित शाह (Amit Shah) या दोन कडवट हिंदू नेत्यांचं देशात राज्य सुरु आहे. राज्यात देखील हिंदुंचं राज्य आलं असं सांगण्यात येत आहे. तरीपण राज्यात आक्रोश मोर्चा निघत आहे. हा आक्रोश मोर्चा योग्यच आहे. कारण स्वत:ला हिंदू समजणाऱ्या नेत्यांकडून हिंदूंना न्याय मिळत नाही. ती भाजपचीच रॅली होती. […]
लखनऊ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा टी-२० सामना लखनऊ येथील अटलबिहारी वाजपेयी या मैदानावर पार पडला.या सामन्यात भारतीय संघाने ६ गडी राखून विजय मिळवला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. या सामन्यात युजवेंद्र चहलने एक विकेट घेताच विक्रम रचला. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होण्याचा विक्रम चहलने आपल्या नावावर केलाआहे. चहलने […]
मुंबई : १९ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमधील मेट्रोसह विविध प्रकल्पांच्या भूमिपूजन आणि उद्घाटनांसाठी आले होते, त्यानंतर अवघ्या २० दिवसांतच पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. येत्या १० फेब्रुवारीला मोदींचा मुंबई दौरा नियोजित करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २० दिवसातल्या दुसऱ्या दौऱ्यामुळे मुंबई महापालिका […]
अहमदनगर : हवेतील आद्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे अहमदनगर शहरासह जिल्ह्यात आज सकाळी सर्वत्र धुके पडल्याचे दिसून आले. या धुक्यात फिरण्याचा आनंद नगरकरांनी आज लुटला. अहमदनगर शहरासह परिसरात काल संध्याकाळपासूनच हवेतील आद्रतेचे प्रमाण वाढलेले होते. मागील तीन-चार दिवसांपासून सकाळी धुके पडत होते. मात्र आज मोठ्या प्रमाणात शहरातसह जिल्ह्यात धुके पडल्याचे दिसून आले. शहरातील सर्जेपुरा, तोफखाना, लाल टाकी, […]
अदानी ग्रूपकडून (Adani Group) काल देण्यात आलेल्या ४१३ पानाच्या उत्तराला हिंडेनबर्ग रिसर्चकडून (Hindenburg Research) त्वरित प्रत्युतर देण्यात आलं आहे. अदानींच्या 413 पानांच्या उत्तरात केवळ 30 पाने आमच्या अहवालात उपस्थित केलेल्या मुद्यांवर असल्याचं हिंडेनबर्ग रिसर्चकडून सांगण्यात आलं आहे. ते पुढे म्हणाले की आम्ही विचारलेल्या ८८ प्रश्नांपैकी ६२ प्रश्रांना उत्तर देता आली नाहीत. Our Reply To Adani: […]
मुंबई : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांत कमाल तापमानात पाच अंशाने वाढ झाली आहे. राज्यात पुढील चार ते पाच दिवस सौम्य थंडी जाणवणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाच्या अंदाजनुसार, महाराष्ट्रात थंडीची लाट 2 फेब्रुवारीपर्यंत कायम राहणार आहे. […]
नवी दिल्ली : हिंडेनबर्गचा रिसर्चचा रिपोर्ट हा भारत, भारतातील संस्था, देशाची प्रगती आणि महत्त्वाकांक्षांवर पद्धतशीर केलेला हल्ला आहे, असं म्हणत अदानी ग्रुपकडून (Adani Group) हिंडेनबर्गला ऊत्तर दिले आहे. यावेळी हा अहवाल स्वतंत्र, वस्तुनिष्ठ किंवा सखोल संशोधनानंतर तयार केलेला नाही, असंही अदानी ग्रुपकडून म्हणण्यात आलं आहे. आपल्या 413 पानांच्या उत्तरात, अदानी ग्रुपने अहवालात उपस्थित केलेल्या सर्व […]