पुणे : राजकीय घराण्यातून एक वारसा आपण जपत असतो. मात्र, वारसा हा तुम्हाला मिळतो. पण तुम्हाला तुमचं कर्तुत्व हे सिद्ध करावंच लागते. त्यामुळे तुम्ही कशा पद्धतीने तुम्हाला उपलब्ध असणारा व्यासपीठाचा वापर करता याच्यावर तुमचं पुढचं भवितव्य हे निश्चितपणाने आवलंबून असते, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अदिती तटकरे यांनी व्यक्त केले. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटच्या वतीने […]
मुंबई : हिंदुरक्षक छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsinh Koshyari) हे सातत्याने करतात तेव्हा भाजपच्या तोंडाला बूच लावलेले असते का, काश्मिरी पंडीत, काश्मिरमधील लोकं स्वतःच्या न्याय हक्कासाठी भांडत आहेत. त्यांना हक्क मिळवून देण्यासाठी भाजपवाले (BJP) कधी मोर्च्या काढणार आहेत, असा सवाल शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपस्थित केला. […]
पुणे : भारतीय जनता पार्टीच्या दिवंगत आमदार मुक्ता (MLA Mukta Tilak) टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात 26 फेब्रुवारी रोजी पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) तिन्ही पक्ष लढण्यावर ठाम आहेत. त्यामुळे पुण्यात महाविकास आघाडीतमध्ये बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, नुकतीच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shivsena) पक्षाच्या […]
मुंबई : मुंबईमधील खराब हवामानाचा फटका आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) प्रवास करत असलेल्या विमानाला बसला आहे. मुंबई विमानतळावरून विमानाने उड्डाण घेतले होते. मात्र, खराब हवामानामुळे विमान माघारी परतले. त्यामुळे शिंदे-फडणवीस यांचा जामनेर दौरा रद्द होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. गोर बंजारा लमाण नाईकडा समाजाच्या धर्म कुंभाचा […]
कर्नाटक : कर्नाटक येथील हम्पी उत्सवादरम्यान प्रसिद्ध गायक कैलाश खेर (kailash kher ) यांच्यावर हल्ला झाला. कैलाश खेर यांचं लाईव्ह कॉन्सर्ट सुरु असताना एका व्यक्तीने गायकाला (singer ) पाण्याची बाटली फेकून मारली. यामुळे कार्यक्रमात एकच खळबळ माजली. ही घटना रविवारी घडली. प्रेक्षक गॅलरीमधूल कैलाश खेर यांच्यावर हल्ला करण्यात आहे. कैलाश खेर यांच्यावर हल्ला केल्यानंतर तात्काळ […]
अहमदनगर : अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांना भाजप उघड पाठिंबा देणार नसला तरी स्थानिक पातळीवर तांबे यांच काम करणार असल्याचे स्पष्ट सांगितलं आहे. सत्यजित तांबे मला भेटले असून माझ्याशी चर्चा केली. मात्र, निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते निर्णय करत असतात, आणि सत्यजित तांबे यांना निवडून आणण्याचा निर्णय आता कार्यकर्त्यांनी केला, असं अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे […]
मुंबई : अनेक वेळा आपण खाण्यापिण्याशी संबंधित अशा काही चुका करत असतो ज्याची आपल्याला जाणीव नसते आणि या चुका आपल्या आरोग्यावर परिणाम करतात, परिणामी आपल्याला उच्च कोलेस्ट्रॉल, मधुमेह, थायरॉईड आणि लठ्ठपणा यांसारख्या आजारांचा धोका वाढतो इतकेच नाही तर कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराचा धोकाही वाढू शकतो.जाणून घ्या अशा कोणत्या चुका आहेत ज्यामुळे हे सर्व आजार होण्याचा धोका […]
कन्याकुमारीपासून सुरु झालेली राहुल गांधी (Rahul gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून अखेर जम्मू काश्मीरमधल्या श्रीनगर येथे पोहोचली आहे. आज या यात्रेचा शेवटचा दिवस आहे. आजच्या समारोपाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी काँग्रेसकडून देशभरातील २१ समविचारी पक्षांना निमंत्रण दिलं होतं. पण ५ पक्षांना काँग्रेसने निमंत्रण पाठवलं नाही. काँगेसने आमंत्रण दिल्यापैकी […]
जयपूर : 2002 च्या गुजरात दंगलीवर बीबीसीचा वादग्रस्त डॉक्युमेंटरी (BBC Documentary) पाहण्यासाठी कॅम्पसमध्ये जमलेल्या अजमेर जिल्ह्यातील राजस्थानच्या सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या (Rajasthan Central University) १० विद्यार्थ्यांना (students) निलंबित करण्यात आले. विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी मात्र या विद्यार्थ्यांचे निलंबन झाल्याचा दावा केला आहे. ‘इंडिया: द मोदी क्वेश्चन’ हा माहितीपट पाहण्याशी त्यांचा संबंध नव्हता. विद्यापीठाने जारी केलेल्या आदेशानुसार, अधिकाऱ्यांच्या सूचनांचे उल्लंघन […]
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) या जाहिराती अनुसार एका पदास १२ उमेदवार या गुणोत्तराणे मुख्यसाठी पात्र केल्यास आमच्या अंदाजानुसार जास्तीत-जास्त १५-२० हजार उमेदवार मुख्य परीक्षेस पात्र होतील. केंद्रातील स्टाफ सीलेक्शन कमिशन द्वारे घेण्यात आलेल्या (CHSL) लिपिक पदांचा टायपिंग स्किल टेस्टचा निकाल २८ फेब्रुवारी २०२२ रोजी जाहीर करण्यात आला होता. या निकालाबद्दल काही तथ्य आम्ही […]