- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
इंजिनिअरच्या बेडरूममध्ये कोटींचे घबाड, दीड कोटींची रक्कम अन् किचनमध्ये लपविलेले सोने-हिऱ्याचे दागिने
Bihar News : बिहारमध्ये श्रीकांत शर्मा या अभियंत्याच्या घरात टाकलेल्या छाप्यात पोलिसांना कोट्यावधींचे घबाड हाती लागले आहे. हनुमान नगर येथील त्याच्या घरातून दीड कोटींची रोकड, लाखो किमतीचे सोन्याचे आणि हिऱ्यांचे दागिने तसंच कोट्यवधी रुपयांच्या जमिनीची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान, या छाप्यानंतर आणि छाप्यात सापडलेल्या रक्कमेनंतर बिहारमध्ये एकच खळबळ उडाली आहे. शर्मा हे बिहार सरकारच्या […]
-
टोलनाका फोडणाऱ्यांचं अमित ठाकरेंकडून अभिनंदन; म्हणाले, इथून पुढे…
Amit Thackeray Samrudhi Highway : नाशिकजवळी सिन्नर येथील टोल नाका तोडफोडीनंतर मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) भाजपच्या निशाण्यावर आले आहेत. हे सरकार जनसामांन्यांचं सरकार आहे. इथे कोणा एका नेत्याच्या मुलासाठी वेगळे नियम नसतील. अमित ठाकरे टोल नाका फोडणे म्हणजे राजकारण नाही. कधीतरी बांधायलाही शिका आणि शिकवा, अशा शब्दात भाजने अमित ठाकरेंना सुनावले होते. तसेच […]
-
कंत्राटी पोलीस भरतीवर फडणवीसांचे मोठे विधान; म्हणाले, कधीही…
DCM Devendra Fadanvis : राज्यामध्ये पोलिसांची कंत्राटी भरती करण्यावरुन विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला होता. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी यावरुन सरकारा धारेवर धरले होते. यावर आता उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत निवेदन दिले आहे. कोणत्याही परिस्थितीत पोलिसांची कंत्राटी भरती होणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. काय म्हणाले फडणवीस? मुंबई पोलीस आयुक्तालयात मोठ्या प्रमाणावर पदं […]
-
NASA ; ‘नासा’ची 90 मिनिटं बत्ती गुल, कट्टर दुश्मन धावला मदतीला
NASA Power Outage : गेल्या काही दशकांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर एकमेंकाचे प्रतिस्पर्धी असलेले रशिया आणि अमेरिका यांच्यात मंगळवारी वेगळंच चित्र जगाने पाहिले. अमेरिकेतील ह्यूस्टन येथील नासाच्या कार्यालयातील लाईट गेल्याने मिशन कंट्रोल आणि इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (International Space Station) यांच्यातील संपर्क तुटला. त्यामुळे मिशन कंट्रोल रूममधून स्पेस स्टेशनला कमांड पाठवता आले नाही आणि कक्षेत असलेल्या सात अंतराळवीरांशी […]
-
Pankhuri Awasthy: लग्नाच्या 5 वर्षानंतर पंखुडी-गौतमच्या घरी चिमुकल्या पाहुण्यांचं आगमन!
Gautam Rode Pankhuri Awasthy Twins Baby: मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय जोडी अभिनेता गौतम रोडे (Gautam Rode) आणि पंखुडी अवस्थी (Pankhuri Awasthy) आई-बाबा झाले आहेत. त्यांच्या घरी दोन चिमुकल्या पाहुण्यांचे आगमन झाले आहे. (Twins Baby) पंखुडीने एक मुलगा आणि एक मुलगी अशा जुळ्यांना जन्म दिला आहे. या जोडीने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर त्यांनी यावेळी दिली आहे. […]
-
OMG 2: खिलाडीच्या ‘ओह माय गॉड 2’मधील 20 दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाची कात्री?
OMG 2 Akshay Kumar: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) म्हणजेच खिलाडीला जवळपास ११ वर्षांनंतर ‘ओएमजी’ म्हणजेच ‘ओह माय गॉड २’ (Oh My God 2) या सिनेमाचा सिक्वेल घेऊन चाहत्यांचे मनोरंजन करणार आहे. हा सिनेमा अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय बनत आहे. गेल्या काही दिवसापासून याची चांगलीच चर्चा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. बस एक महीने […]
-
ODI World Cup 2023: भारत आणि पाकिस्तान हायव्होल्टेज सामन्याची तारीख बदलणार?
India vs Pakistan : 2023 च्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर होणार आहे. जगभरातील क्रिकेटप्रेमी या महामुकाबल्याची मोठ्या आतुरतेने वाट पाहात आहेत. पण आता या सामन्याची तारीख बदलली जाणार आहे. सुरक्षा यंत्रणांनी बीसीसीआयला नवरात्रोत्सवाचे कारण देत तारीख बदलण्याचे सांगितले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट विश्वचषकाची तारीख […]
-
केंद्राची पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव; ED चे संचालक संजय मिश्रा यांचा कार्यकाळ वाढवण्याची मागणी
ED Director Sanjay Mishra : ईडीचे संचालक संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ वाढवण्यासाठी केंद्राने पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 27 जुलै रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार एसके मिश्रा यांचा ईडी संचालक म्हणून कार्यकाळ 31 जुलै रोजी संपणार आहे. विशेष म्हणजे, याआधी केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाकडून जोरदार झटका बसला होता. […]
-
‘ही तर कलानगरची बार्बी’; नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
Nitesh Rane On Udhdhav Thackeray : भाजप आमदार नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मुंबई महापालिकेमध्ये मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी कार्यालय उघडल्यावरुन ठाकरे गटाने आक्षेप घेत जोरदार टीका केली. यावरुन नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काही दिवसांपासून आदित्य ठाकरे मुंबईचे पालकमंत्री लोढा यांच्यावर टीका […]
-
MIDC साठी मंत्री असल्यापासूनच राम शिंदेंचे प्रयत्न; श्रेयवादाच्या लढाईत उदय सामंतांनी आणला नवा ट्विस्ट
Uday Samant On Rohit Pawar : कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार हे गेल्या काही दिवसांपासून कर्जत येथे एमआयडीसीला मंजुरी मिळावी यासाठी चांगलेच आक्रमक झाले आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी विधानभवन परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ पावसात आंदोलन केले होते. यानंतर आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या एमआयडीसीबद्दल मोठे विधान केले असून यामुळे रोहित पवारांना चांगलाच दणका […]









