- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर हल्ला : रावणराज चालवले… म्हणूनच जनतेने त्यांना हटवले!
Eknath Shinde : उद्धव ठाकरे यांचेच रावणाच राज्य होते. त्यांच्या पापाचा घडा भरला म्हणून त्यांना जनतेने हटवले आहे, अशी जहरी टीका उद्भव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षासारख्या काही जणांना हिंदू धर्माची, हिंदुत्वाची अलर्जी झाली आहे. तर काही जण सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करत आहे, असे म्हणत […]
-
NZ vs SL : टिम साइफर्टच्या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने तिसरा टी-20 सामना जिंकला
NZ vs SL : न्यूझीलंडने तिसऱ्या टी-20 सामन्यात श्रीलंकेवर चार विकेट राखून विजय मिळवत मालिका 2-1 ने जिंकली. टीम सिफर्टने 48 चेंडूत 88 धावांची खेळी केली. कुसल मेंडिसच्या 48 चेंडूत 73 धावांच्या जोरावर श्रीलंकेने 6 बाद 182 धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने 19.5 षटकांत 6 गडी गमावून 183 धावा केल्या. न्यूझीलंडने दुसरा सामना नऊ गडी राखून […]
-
Eknath Shinde यांचा पवार, ठाकरेंवर निशाणा… म्हटले काहींना हिंदूची अॅलर्जी होतेय!
Eknath Shinde : उद्धव ठाकरे हे टीका करायचे मंदिर वही बनायेंगे तारीख नाही बतायेंगे. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिर बांधलं आणि तारीख देखील सांगितली आहे. त्यामुळे पहिले मंदिर फिर सरकार हे बोलणारे कुठे आहेत? असे आरोप करणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिलं आहे, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास […]
-
Eknath Shinde : राम मंदिर हिंदुत्वाचे प्रतिक… बाळासाहेबांचे स्वप्न मोदींनी पूर्ण केले!
Eknath Shinde : अयोध्या आणि राम मंदिर आमच्या श्रद्धेचा, आस्थेचा विषय आहे. राम लल्लावर आमची श्रद्धा आहे. दोन-तीन दिवसांपासून अयोध्येत राम भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अयोध्या हे स्थान हिंदुत्वाचे प्रतिक आहे. श्री राम मंदिर बनावे हे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होत ते पूर्ण होत आहे, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]
-
शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र येणार? एकनाथ शिंदेंनी अयोध्येत दिलं उत्तर
Eknath Shinde on Ayodhya Tour : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या आमदार, खासदार आणि मंत्र्यासोबत अयोध्या दौऱ्यावर (Ayodhya Tour) गेले आहेत. या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांचे भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेत बंडखोरी केल्याचं एकनाथ शिंदे सांगतात. भविष्यात ठाकरे गट आणि शिंदे गट एकत्र येणार का? या प्रश्नाचे उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्या दौऱ्यात दिले […]
-
गुलाबराव पाटलांनी सांगितला, ‘1992 आणि आताच्या अयोध्या दौऱ्यातील फरक’
Eknath Shinde on Ayodhya Tour : उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) हिंदुत्व सोडलं असा आरोप करत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केली होती. भाजपसोबत आपण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती केली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) वारंवार सांगत असतात. एकनाथ शिंदे यांनी आपली हिंदुत्वाची धार आणखी तेज करण्यासाठी आयोध्या दौरा काढला आहे. यासाठी त्यांनी शिवसेनेतील आमदार, खासदार […]
-
Deepak Kesarkar : लोकांची सेवा कशी करायची हे आम्हाला शिकवण्याची गरज नाही
Eknath Shinde on Ayodhya Tour : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार, खासदार आयोध्या दौऱ्यावर (Ayodhya Tour) गेले आहेत. या दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी टीका केली आहे. राज्यात अवकाळी पावसाचे संकट असताना शेतकऱ्यांवर वाऱ्यावर सोडून दौरा करत आहेत. पवारांच्या टीकेला मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. […]
-
कुख्यात बुकी अनिल जयसिंघानीला ईडीकडून अटक
Anil Jaisinghani Arrest: ईडीने बुकी अनिल जयसिंघानी याला अब्जावधी डॉलर्सच्या मनी लॉन्ड्रिंग (money laundering) प्रकरणात अटक केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) यांना खंडणी आणि ब्लॅकमेल केल्याच्या आरोपाखाली त्याची मुलगी अनिक्षा (Aniksha Jayasinghani) हिला काही दिवसांपूर्वीच अटक करण्यात आली होती. यामध्ये अनिल जयसिंघानी हा देखील सहआरोपी होता. अनिल जयसिंघानी यांच्यावर […]
-
काळी टोपी, खाकी पँट आणि प्रिंटेड टी-शर्ट… नरेंद्र मोदींच्या वेगळ्या लूकची चर्चा
PM Modi New Look:पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) 2020 मध्ये बेअर ग्रिल्सच्या मॅन व्हर्सेस वाईल्ड या शोमध्ये सहभागी झाले होते. हा शो उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये कॅप्चर केला होता. त्यावेळी मोदींच्या लूकची जगभरात मोठी चर्चा झाली होती. आता पुन्हा एकदा नरेंद्र मोदी कर्नाटकातील व्याघ्र प्रकल्पाला (Mudumalai Tiger Reserve) भेट देणार आहेत. त्यांच्या काळी टोपी, […]
-
अवकाळी पावसाने शेतकरी रडकुंडीला, शेतीचं प्रचंड नुकसान
Maharashtra Rain: राज्यात काल रात्री विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने (unseasonal rain) धुमाकुळ घातला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे (farmers) प्रचंड नुकसान झाले आहे. कांदा, आंबा, द्राक्षे, टरबूज, संत्रा कलिंगड, गहू, हरभरा, काजू अशा सर्वच हाताशी आलेली पिक गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यात शुक्रवारपासून बीड, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, कोकण, अमरावती, बुलढाणा, सांगली, परभणी, यवतमाळ या जिह्यात वादळी […]









