महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवर होळीच्या सुट्टींनंतर आजपासून सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी सुरु झाली. सत्तासंघर्षां वरील सुनावणीमध्ये ठाकरे गटाकडून युक्तिवाद पूर्ण झाला आहे तर आता शिंदे गटाकडून युक्तिवाद सुरु आहे. ठाकरे गटाकडून वरिष्ठ वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली आहे तर शिंदे गटाच्या वतीने हरीश साळवे, नीरज कौल, महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला. सुप्रीम कोर्टात […]
मुंबई : शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांच्या बदनामीकारक व्हिडीओ बद्दल राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेत राज्याच्या गृहविभागाकडे तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या की, राज्यात महिला लोकप्रतिनिधींना सोशल मीडियावरून ट्रोल करण्याचे प्रकार वाढत आहेत. जर लोकप्रतिनिधींबाबत असे प्रकार होत असतील तर राज्यात महिला सुरक्षित आहेत का, असा […]
मुंबई : अर्थसंकल्पीय भाषण करत असताना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पातील मुद्दा क्रमांक १२६ मानसिक अस्वास्थ व व्यवसनाधिनता दूर करण्यासाठी केंद्र स्थापन करण्याबाबत आहे. तसेच १६५ वा मुद्दा हा स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारका विषयीचा आहे. अर्थसंकल्पाची प्रकाशने सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येतात. मात्र अर्थमंत्र्यांचे अर्थसंकल्पीय भाषण पअलावर ठेवण्यात येत नाही त्यामुळे त्याबाबतचा खुलासा सरकारने करण्याची […]
मुंबई : मागील वर्षीच्या अर्थसंकल्पाची अंलबजावणी न करता केवळ एकनाथ शिंदे गटाच्या चाळीस आमदारांना सांभाळण्यासाठी निधीची उधळण करण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या गटाच्या चाळीस आमदारांच्या कामांना मंजुरी देण्याचा सपाटा लावला. आपल्या गटाच्या आमदारांच्या हजारो कोटींच्या कामांना मंजुरी दिल्यामुळे चालू वर्षाच्या बजेटपेक्षा मंजूर कामे आणि खर्च वाढला. ठाणे आणि मिरा-भाईंदर महानगरपालिकेवर निधीची उधळण करण्यात आली आहे. […]
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्भव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आज आणखी एक धक्का बसला आहे. ठाकरे यांचे विश्वासू आणि माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांचा मुलगा भूषण याने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर या सरकारच्या अजेंड्यावर एमआयडीसीमधील (MIDC) घोटाळा हा मुख्य […]
मुंबई : मालाड पूर्व (Malad East) भागातील आनंद नगर (Anand Nagar) परिसरात झोपडपट्टीत भीषण आग लागली आहे. आगीनंतर धुराचे लोट उठत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ही आग लेव्हल 3 ची आहे. यात एकाचा मृत्यू आहे 15 ते 20 सिलेंडरचे स्फोट झाले आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचून त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. आतापर्यंत […]
पिंपरी : मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे यांच्या बहिणीचा वाकड येथे संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह वाकड येथे आढळून आला असून त्यांच्या शरीरावर आणि चेहऱ्यावर जखमा असल्याचे आढळून आले आहे. भाग्यश्री मोटे (Bhagyashree Mote) यांच्या बहिणीचे नाव मधू मार्कण्डेय (Madhu Markandey) असे असून त्या केक बनवण्याचा व्यवसाय करत होत्या. रविवारी त्या एका मैत्रिणीसोबत भाड्याने राहण्यासाठी […]
शिर्डी लोकसभा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आलाय. त्यांच कारण म्हणजे रामदास आठवलेंनी पुन्हा एकदा येथून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्ती केलीय. त्यामुळे आता खासदार सदाशिव लोखंडेंच टेन्शन वाढलंय.
द एलिफंट व्हिस्परर्स डॉक्युमेंट्रीला सर्वोत्कृष्ट शॉर्ट डॉक्युमेंट्री चा ऑस्कर पुरस्कार मिळाला यावेळी निर्माती आणि दिग्दर्शिका ऑस्करच्या मंचावर दिसल्या, त्यांच्याविषयी रिपोर्ट
नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला तामिळनाडू, केरळ, आसाम, कर्नाटक आणि अंदमान आणि निकोबार बेटांमधील रेडक्रॉस (Red Cross) सोसायटीच्या प्रादेशिक शाखांमध्ये कथित भ्रष्टाचाराच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तामिळनाडूतील एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्य शाखेच्या कामकाजातील गंभीर आरोप राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले आहेत. रेडक्रॉसच्या (Red Cross Society) पाच शाखांमध्ये भ्रष्टाचार आणि आर्थिक अनियमिततेच्या तक्रारींवरून रेड क्रॉस […]