नवी दिल्ली : शिंदे-ठाकरे गटातील सत्तासंघर्षाची (Political Crisis) सुनावणी गेल्या तीन दिवसांपासून सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुरु होती. यामध्ये दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. या प्रकरणातील महत्वाचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं आज राखून ठेवला आहे. शिंदे-ठाकरे प्रकरणाची सुनावणी नबाम रेबिया प्रकरणानुसार होणार का? हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे जाणार का? याबाबतचा निकाल उद्या (शुक्रवारी) सुप्रीम […]
मुंबई : पहाटेच्या शपथविधीबद्दल मला काहीही बोलायचे नाही. विषय संपला, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) गौप्यस्फोटवर अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाष्य करणे टाळले. शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच पहाटेचा शपथविधी झाल्याचा दावा फडणवीसांनी केला होता. या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. ‘देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घेतलेल्या शपथविधीबद्दल काहीही बोलायचे नाही. विषय संपला. […]
पुणे : कसब्याची निवडणूक (kasbah Bypoll Election) चूरशीची वैगरे काही नाही. आपण निवडणूक जिंकणार. चांगल्या मताने जिंकणार. नक्की निवडूण येणार.दोघांचे काम चांगले आहे. काळजी करू नका. निवडूण आल्यावर मी स्वत पेढे वाटायला येईन, असा विश्वास पुण्याचे भाजप (BJP) खासदार गिरीष बापट (Girish bapat) यांनी व्यक्त केला. जिवाची तमा न बाळगता बापट पक्षासाठी पोटनिवडणुकीच्या मैदानात उतरले […]
पुणे : चिंचवड विधानसभा मतदारसंघातील (Chinchwad byelection) महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार नाना काटे (Nana Kate) यांनी बुधवारी नवी सांगवी आणि पिंपळे गुरव परिसरात दिवसभर पदयात्रा, गाठीभेटी आणि बैठका घेऊन प्रचारात जोरदार आघाडी घेतली. आज झालेल्या पदयात्रांमध्ये महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हजेरी लावत एकजुटीचा प्रत्यय आणून दिला. त्यामुळे प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात तरी […]
मुंबई: शिर्डीत (Shirdi) दर्शनाला जाणाऱ्या साईभक्तांसाठी तिसरी आनंदाची बातमी आहे. नागपूर ते शिर्डी हा समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खुला झाला. त्यापाठोपाठ मुंबई ते शिर्डी अशी वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) सुरू झाली आणि आता नाईट लँडिंगची (Night Landing) सवलत प्राप्त झाल्याने पहाटेच्या काकडआरतीला उपस्थित राहू इच्छिणार्यांना रात्री प्रवास करुन […]
भोपाळ : संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याने मध्य प्रदेशातील बागेश्वर धाम बाबा (Bageshwar Baba) चर्चेत आला होता. नागपूरातील (Nagpur) एका कार्यक्रमात बाबा अंधश्रद्धा पसरवत असल्याचा आरोप करत श्याम मानव (Shyam Manav) यांनी तक्रार दाखल केली होती. यानंतर मोठा वादही निर्माण झाला होता. आता पुन्हा एकदा बागेश्वर धाम बाबा वादात सापडला आहे. सध्या बागेश्वर […]
कोल्हापूर : जिल्ह्यात आमदार सतेज पाटील (Satej Patil) आणि आमदार विनय कोरे यांच्यात राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. गेल्या काही दिवसांपासून करवीर तालुक्यातील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याच्या (Kumbi-Kasari Cooperative Sugar Factory) निमित्ताने पुन्हा एकदा दोघे समोरासमोर आले होते. यामध्ये सतेज पाटील यांनी विनय कोरे यांना धोबीपछाड देत कारखान्यावर वर्चस्व कायम ठेवले आहे. आमदार सतेज पाटील गटाचे […]