World Cup 2023: इंग्लंडने बांग्लादेशचा (ENG vs BAN) 137 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला आहे. बांग्लादेशला सामना जिंकण्यासाठी 365 धावांचे लक्ष्य होते, मात्र शकिब अल हसनचा (Shakib Al Hasan) संघ 48.2 षटकात केवळ 227 धावांच करु शकला. अशाप्रकारे जोस बटलरच्या (Jos Butler) नेतृत्वाखाली गतविजेत्या इंग्लंडने वर्ल्डकपमध्ये पहिला विजय नोंदवला. याआधी इंग्लंडला न्यूझीलंडविरुद्ध 9 गडी राखून […]
Ajit Pawar : गेल्या 32 वर्षापासून पुणे जिल्हा बँकेचे (Pune District Bank) संचालक असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. उपमुख्यमंत्रीपद आणि पक्षाचा वाढता व्याप लक्षात घेता हा राजीनामा देण्यात आला आहे. या संदर्भातील माहिती बँकेचे अध्यक्ष दिगांबर दुर्गाडे यांनी दिली आहे. मागील 32 वर्षापासून अजित पवार जिल्हा बँकेचे […]
Sanjay Singh arrested : दिल्लीतील मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्या ईडी कोठडीत मंगळवारी न्यायालयाने 13 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली. सिंह यांना ईडीने 4 ऑक्टोबर रोजी मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर त्यांना पाच दिवसांच्या ईडीच्या कोठडीत पाठवण्यात आले होते. रिमांड संपल्यानंतर ईडीने त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले. आता […]
washim news : वाशिम जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. एका शिक्षकाला अज्ञात आरोपींनी मारहाण करत जिवंत जाळले आहे. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. यामध्ये शिक्षक सुनील उर्फ दिलीप धोंडुजी सोनवणे यांचा मृत्यू झाला. शिक्षक सुनील सोनवणे हे शाळेवर जात असताना अज्ञात आरोपींनी हल्ला करुन लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. यानंतर त्यांना जिवंत जाळण्यात आले. […]
Cabinet meeting : शिंदे-फडणवीस-पवार मंत्रिमंडळाची (Cabinet meeting) आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुलींच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मार्च 2023 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लेक लाडकी योजनेची (Lek Ladki Yojana) घोषणा केली होती. त्याचा आज अंतिम प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात आला, अशी माहिती मंत्रिमंडळ बैठकीनंतर महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी […]
Cabinet meeting : शिंदे-फडणवीस-पवार सरकारने मुलींच्या सक्षमीकरणासाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. मुलींसाठी लेक लाडकी योजना राबवली जाणार आहे. तसेच औरंगाबाद विद्यापीठाच्या नावात छत्रपती संभाजीनगर असा बदल करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील पीक पाण्याचाही आढावा घेण्यात आला. या संदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाने ट्वीट करत माहिती दिली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यतेखाली […]
Assembly Elections : पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोगाने सोमवारी (9 ऑक्टोबर) जाहीर केल्या आहेत. यात राजस्थान, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मिझोरामचा समावेश आहे. यानंतर एबीपी न्यूज आणि सी-व्होटरने घेतलेले ओपिनियन पोल समोर आला आहे. या ओपिनियन पोलनुसार राजस्थानमध्ये काँग्रेसला झटका बसू शकतो. येथे भाजपला बहुमत मिळताना दिसत आहे. तर छत्तीसगडमध्ये काँग्रेस […]
World Cup 2023: बलाढ्य न्यूझीलंडने वर्ल्डकपमध्ये नेदरलँडचा पराभव केला आहे. किवी संघाने डच संघाचा 99 धावांनी पराभव केला आहे. अशा प्रकारे न्यूझीलंड संघाने सलग दुसरा विजय नोंदवला आहे. यापूर्वी किवी संघाने इंग्लंडचा पराभव केला होता. मात्र, या विजयानंतर न्यूझीलंड संघाने गुणतालिकेत आपले स्थान मजबूत केले आहे. न्यूझीलंडचे 2 सामन्यांनंतर 4 गुण आहेत. याशिवाय किवी संघाचा […]
Israel Palestine War : इस्रायलच्या भागात सुरक्षा कर्मचारी आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच आहे. इस्रायलच्या हवाई दलाने हमासच्या ताब्यात असलेल्या गाझामध्ये वेगाने हल्ले केले आहेत. युद्धाच्या घोषणेपासून, इस्रायली विमानांनी गाझा पट्टीतील 426 ठिकाणांना लक्ष्य केले आहे. युद्धात आतापर्यंत सुमारे 800 इस्रायली लोकांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी (7 ऑक्टोबर) हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर एकामागून एक प्रचंड हवाई हल्ले […]
Israel Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू झालेल्या युद्धाचे परिणाम आता दिसू लागले आहेत. या युद्धाचा परिणाम सोन्या-चांदीच्या किंमतींबरोबरच शेअर बाजारावरही झाला आहे. जिथे सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. शेअर बाजारात घसरण झाली आहे. जागतिकीकरणाच्या युगात कोणत्याही देशात घडणाऱ्या सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टींचा परिणाम इतर देशांवर होतो. रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे झालेल्या नुकसानातून […]