- Letsupp »
- Author
- Pravin Survase
Pravin Survase
-
Mahanand Milk Federation : बहुमत राष्ट्रवादीला; मात्र ‘महानंद’ची सूत्रे विखे पाटलांच्या हाती
अहमदनगर : महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या संचालकपदाच्या 21 जागांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत 16 संचालक आधीच बिनविरोध निवडून आलेत. त्यात उर्वरीत महाराष्ट्र विभागातून राजेश परजणे पाटील यांची बिनविरोध निवड झाली. विशेष म्हणजे राष्ट्रवादीकडे बहुमत असताना महानंदच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे यांना आपले सख्खे मेहुणे राजेश परजणे यांची वर्णी लावता आली. महानंदवर राष्ट्रवादी काँग्रेसचे कायम वर्चस्व राहिले […]
-
Beed Attack : नायब तहसीलदारांवर पेट्रोल हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न
बीड : केज तहसील कार्यालयात नायब तहसीलदार पदावर असणाऱ्या आशा वाघ (Asha Wagh) यांच्यावर पेट्रोल टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याची घटना घडली आहे. या धक्कादायक प्रकाराने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आशा वाघ या हल्ल्यातून थोडक्यात बचावल्या असून त्यांच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्या केज तहसील कार्यालयातील, संजय गांधी निराधार […]
-
Mns Chief Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात
ठाणे : आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने अनेक राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरु झाली आहे. यातच नेतेमंडळी देखील दौरे करू लागले आहे. यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)हे आज मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात (Thane) येणार आहे.टेंभीनाका भागातील एका कार्यक्रमाला ते हजेरी लावणार आहे. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने त्यांचा हा दौरा अत्यंत महत्वपूर्ण मानला जातो आहे. राज ठाकरे […]
-
Sharad Pawar & Eknath Shinde : शरद पवार आणि एकनाथ शिंदे आज एकाच मंचावर
पुणे : पुण्यातील (Pune) मांजरी या ठिकाणी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 46 वी सर्वसाधारण सभा आज पार पडणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज एकाच मंचावर एकत्र येणार आहेत. दरवर्षी या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित ही सभा पार पडत असते. मांजरी येथे वसंतदादा शुगर […]
-
IND vs NZ: भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा सामना आज रंगणार
मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन वनडे मालिकेतील दुसरा सामना छत्तीसगडमधील रायपूर स्टेडियमवर होणार आहे. भारतीय संघाने मालिकेतील पहिला सामना 12 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता दुसरा एकदिवसीय सामना जिंकून भारतीय संघ मालिका विजयाकडे वाटचाल करू शकतो. दुसरा एकदिवसीय सामना छत्तीसगडमधील रायपूर स्टेडियमवर खेळवला जाईल. या मैदानावर यापूर्वीही अनेक सामने […]
-
Vaibhav Pichad : अमृतसागर दूध संघाच्या अध्यक्षपदी वैभव पिचड तर उपाध्यक्षपदी रावसाहेब वाकचौरे
अहमदनगर : अकोले तालुक्यातील अमृतसागर सहकारी दूध व्यावसायिक व प्रक्रिया संघाच्या अध्यक्षपदी माजी आमदार वैभव पिचड (Vaibhav Pichad) यांची तर उपाध्यक्षपदी रावसाहेब वाकचौरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडणुकीत महाविकास आघाडी व मित्र पक्षांच्या शेतकरी समृद्धी मंडळाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या मंडळाला अवघ्या 2 जागांवर समाधान मानावे लागले होते. तर शेतकरी विकास […]
-
Ahmednagar Accident: नगर शहरातील उड्डाणपूलावर अपघातात वकिलाचा मृत्यू
अहमदनगर : अखेर अहमदनगरच्या (Ahmednagar) उड्डाणपूलावर पहिला बळी गेलाच. दुचाकीच्या अपघातात नगरमधील अनिरुद्ध रामचंद्र टाक या वकिलाचा मृत्यू (Death) झाला आहे. पुलावरील वळणावर शुक्रवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, टाक आपल्या दुचाकीवरून जात होते. एक वाहन त्यांना धडक (Accident) देऊन निघून गेले. घटनास्थळी पोहचलेले घरघर लंगर सेवेचे प्रमुख, […]
-
Hyundai Car : ह्युंडाईने लॉन्च केली आपली सर्वात स्वस्त कार
नवी दिल्ली : वाहन निर्माता कंपनी ह्युंडाईने (Hyundai) आपली ह्युंडाईने ग्रँड आय 10 Nios (Hyundai Grand i10 Nios) फेसलिफ्ट कार लॉन्च केली आहे. जी ह्युंडाईचे सर्वात स्वस्त मॉडेल असल्याचे सांगितले जात आहे. कंपनीची या कारची किंमत 5.58 लाख रुपये आहे. नवीन फेसलिफ्टमध्ये ब्लॅक रूफसह स्पार्क ग्रीन आणि ब्लॅक रूफसह पोलर व्हाइट यासारख्या आश्चर्यकारक ड्युअल-टोन पेंट […]
-
Breaking News : माजी आरोग्यमंत्री दीपक सावंतांच्या कारला अपघात
मुंबई : माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या कारला अपघात (Accident) झालेला आहे. काशिमीरा भागात त्यांच्या कारला डंपरने धडक दिली असल्याची माहिती समोर आली आहे. या धडकेत दीपक सावंत जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अंधेरीतील क्रिटिकेअर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत आधिक माहिती अशी, माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत (Deepak Sawant) पालघरला आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूसंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करायला […]
-
रस्त्यांच्या टेंडर प्रक्रियेत भाजपचा हस्तक्षेप ; राष्ट्रवादीकडून तीव्र निदर्शने…
पुणे : पुणे शहरातील विविध भागात रस्त्याच्या कामाच्या निविदेत ठराविक ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून रस्त्याच्या कामाची निविदा तयार करण्यासाठी व त्यात दबाव आणून स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे आमदार, माजी आमदार, माजी पक्षनेते व पदाधिकारी अन्य ठेकेदारांना धमकावत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. या निविदेतील अटी व शर्ती दुरूस्त करुन पुन्हा निविदा […]










