मुंबई : बॉक्स ऑफिसवर ‘पठान’ (Pathaan) ची जादू 10 व्या दिवशीही कायम आहे. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) च्या कमबॅक चित्रपटाची क्रेज रिलीजच्या 10 व्या दिवशीही कायम आहे. तर कमाई देखील रेकॉर्डतोड सुरू आहे. शुक्रवारी या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केलेली स्पाय थ्रिलर ‘पठान’ बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालत […]
मुंबई : ‘नाशिक पदवीधर निवडणूक चर्चेत राहिली ते कॉंग्रेसच्या सुधीर तांबेंऐवजी ऐनवेळी त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने. कॉंग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे सत्यजित हे भाचे आहेत. त्यामुळे सत्यजित तांबे यांच्या निमित्ताने त्यांचे मामा बाळासाहेब थोरात यांची जिरवता येईल का ?’ असा प्लान कॉंग्रेस असावा असा सावाल आजच्या सामनाच्या अग्रलेखातून उपस्थित करण्यात […]
वर्धा : ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन काय, किंवा इतर ठिकाणी होणारी साहित्यविषय संमेलनं काय, गेली अनेक वर्षं मी त्यांना प्रत्यक्ष हजेरी लावत आलो आहे. आम्ही पडलो राजकारणी. मग अशा संमेलनांना आम्ही गेलो की एक प्रश्न हमखास विचारला जातो की साहित्याच्या व्यासपीठावर राजकारण्यांचं काय काम ?’ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या […]
मुंबई : मराठीत सुपरहीट ठरलेल्या अॅटम सॉंग्गने ओळख निर्माण करणारी अभिनेत्री आणि उत्तम नृत्यांगना म्हणजे मानसी नाईक. मानसी आता एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. मानसीचा आज वाढदिवस आहे आणि त्या निमित्त मानसी फॅन्ससाठी खास गिफ्ट घेऊन आली आहे. मानसी एका हिंदी वेब फिल्ममध्ये दिसून येणार आहे. फिल्मचं पोस्टर आजच्या खास दिवशी रिलीज करण्यात आलं आहे. […]
मुंबई : पत्त्याच्या खेळात हरलेला पती थेट पत्नी डावावर लावत करारनामा करतो. ऐकूनच चीड येणारी ही गोष्ट आहे. मात्र असाच एक वेगळा विषय ‘सरला एक कोटी’ या चित्रपटात पाहायला मिळतोय. एक हटके कहाणी असलेला हा चित्रपट शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा आणि उत्कंठा वाढवणारा आहे. नितीन सिंधुविजय सुपेकर लिखीत, दिग्दर्शित सरला एक कोटी या चित्रपटात सत्य घटनांवरुन […]
हैद्राबाद : जेष्ठ तेलगू दिग्दर्शक कासिनाथनि विश्वनाथ म्हमजेच के. विश्वनाथ यांचं निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. गुरूवारी रात्री उशीरा त्यांची प्राणज्योत मालवली. वयोमानामुळे ते विविध गंभीर आजाराने ग्रस्त होते. त्यांच्यावर हैद्राबादमधील रूग्णालायात उपचार सुरू होते. या दरम्यान त्यांच निधन झालं. 2017 मध्ये त्यांना ‘बाळासाहेब फाळके पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले होते. 1992 साली त्यांना पद्मश्री […]
वर्धा : आजपासून वर्धा शहरात 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) सुरूवात झाली आहे. यावेळी ग्रंथदिंडीने साहित्य संमेलनाला सुरूवात झाली. मोठ्या संख्येने वारकरी संप्रदायातील मंडळी तसेच गुरुदेव सेवा मंडळानी हरिपाठ आणि लेझीमचे पथक सादर केले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या 96 व्या […]
अहमदनगर : महाराष्ट्रातील नावाजलेली व अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठी मॅरेथॉन स्पर्धा म्हणून ओळख असलेली नगर रायझिंग मॅरेथॉन स्पर्धा यंदा रविवारी (ता. 5) आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे आयोजन नगर रायझिंग फाउंडेशनने केले आहे. या स्पर्धेसाठी अडीच हजार धावकांनी सहभाग नोंदविला आहे, अशी माहिती नगर रायझिंग फाउंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया व स्पर्धेचे मुख्य संयोजक संदीप […]
अहमदनगर : नगर रायझिंग फाउंडेशन तर्फे रविवारी (ता. 5) नगर रायझिंग मॅरेथॉन स्पर्धा अहमदनगर-पाथर्डी रस्त्यावर घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी पहाटे 5 ते सकाळी 10 या वेळेत या रस्त्यावरील वाहतूक इतरत्र वळविण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आज (गुरुवारी) काढले. या कालावधीत पाथर्डी- अहमदनगर अशी ये-जा करणाऱ्या अवजड वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आला आहे. […]
अहमदनगर : अहमदनगर शहरात महावितरणकडून शनिवारी 4 फेब्रुवारीला महत्त्वाच्या यांत्रिक दुरुस्तीसाठी शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे अहमदनगर शहरातील मध्यवर्ती भागासह उपनगरातील पाणी पुरवठा तीन दिवस विस्कळीत राहणार आहे. अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त यशवंत डांगे यांनी दिली. महावितरण कंपनीकडून मुळा धरण परिसरातील फिडर दुरुस्तीचे काम शनिवारी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. त्यासाठी […]