मुंबई : शुक्रवारी नुकतच राज्याचं हिवाळी अधिवेशन समाप्त झालं. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दिनांक 19 डिसेंबर 2022 ते दिनांक 30 डिसेंबर 2022 दरम्यान नागपूर येथे पार पडले. त्यानंतर आता राज्यातील सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारकडून या अगोदर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या […]
नागपूर : आज विधिमंडळाच्या नागपूरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी बोलताना महापुरूषांचा अपमानप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी घेतला विरोधकांचा समाचार घेतला. यावेळी त्यांनी महापुरूषांच्या अपमानप्रकरणा पासून ते थेट अंधश्रद्धेच्या विरोधात सातत्याने लढले, त्याच प्रबोधनकरांचे वारसदार म्हणविणारे लिंबू फिरवण्याची लिंबू-टिंबूची भाषा करत आहेत. कुठं चाललो आहेात आपण, असा सवालही एकनाथ शिंदे यांनी केला. ‘दुःख या गोष्टीचा वाटतंय की, […]
नागपूर : महापुरूषांचा अपमान करतात म्हणून भाजप आणि शिंदे गटावर गेल्या काही दिवसांत अनेकदा आरोप करण्यात आले मात्र आज विधिमंडळाच्या नागपूरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी बोलताना महापुरूषांचा अपमानप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी घेतला विरोधकांचा समाचार घेतला. गेल्या काही दिवसांपासून पाहतोय रोज हातात फलकं, बॅनर घेऊन पायऱ्यांवर आंदोलनं, आम्हाला बदनाम करतात. राजीनामे मागतात. महापुरूषांचा अपमान करतात म्हणून […]
नागपूर : ‘महाराष्ट्रामध्ये सहकाराची चळवळ तळागाळामध्ये पोहोचवण्याचं काम स्वर्गीय माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी केलं. त्यामध्ये सांगली जिल्हा हे सहकाराचं केंद्र होतं. तर सांगली जिल्हा बँक सामान्यांसाठी आणि कष्टकऱ्यांसाठी काम करत होती. पण गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हा बँकेमध्ये सत्ता आल्यानंतर त्या बँकेच्या माध्यमातून अनेक गैरव्यावहार झाले आहेत. नोकर […]
नागपूर : उस्मानाबाद जिल्ह्यातील अनाथालयाचे अनुदान मंजूर करण्यासाठी लाच मागणाऱ्या महिला-बालविकास अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केलेला मुद्दा गंभीर असून या प्रकरणाची चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिले. अजित पवार म्हणाले की, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी राष्ट्रसेवा दलाचे […]
अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबा (हिराबेन मोदी) यांचं निधन झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शुक्रवारी सकाळी ही माहिती देण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून हिराबेन यांच्यावर यूएन मेहता रुग्णालयात उपचार सुरु होते. आज पहाटे साडेतीन वाजता उपचारादरम्यान हिराबेन मोदी यांचे निधन झाले. आईच्या निधनची बातमी कळताच मोदी तात्काळ अहमदाबादला […]
मुंबई : काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एक कार्यक्रम पार पडला होता. या कार्यक्रमात गर्दी झाली. या गर्दीत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका महिलेला हाताने बाजूला केले. याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरलही झाला होता. मात्र त्यानंतर या मिहिलेने आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात आव्हाड यांना अटकही […]
नागपूर : ‘पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. वाढत्या लोकसंख्येसोबत शहरातील सोयीसुविधांत वाढ होण्याची गरज आहे. हिंजवडीसारख्या परिसरातील उद्योग राज्याबाहेर हैदराबादकडे स्थलांतरित होत आहेत. युवकांच्या नोकऱ्यांचा प्रश्न आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महत्त्वाची शहरं असून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आयोजित […]
नागपूर : ‘तत्कालीन महसूल राज्यमंत्री व विद्यमान मंत्री यांनी वाशीम जिल्ह्यातील मंग्रुलपीर तालुक्याच्या सावरगाव येथे गायरान जमीन खाजगी व्यक्तीला वाटप केल्याची बाब उघड झाली.ज्यावेळेस मंत्री महोदय मंत्री पदाची शपथ घेऊन कामाला सुरुवात करतात,त्यावेळेस अशा घटना घडणं योग्य नाही. ह्या जमिनीचं वाटप नियमबाह्य पद्धतीनं झालेलं आहे.यात आर्थिक व्यवहार झाल्याची शक्यता आहे.अशी प्रकरणं सातत्यानं पुढे येत आहेत.या […]
नागपूर : ‘भ्रष्टाचारावर कठोर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार लोकायुक्त कायद्याचा मसुदा विधिमंडळात संमत करून घेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरुंगवास भोगणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीनमुक्तीचा सोहळा साजरा करत होते. भ्रष्टाचाऱ्यांचे उदात्तीकरण करणाऱ्या या संस्कृतीमुळे महाराष्ट्राची मान लाजेने खाली गेली आहे. अशी कठोर टीका भाजपाच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी आज […]