Palak Tiwari : ‘माझी आई म्हणजे देसी आंटी’…’ : श्वेता तिवारीच्या मुलीचे धक्कादायक विधान

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 19T171243.729

Palak Tiwari: अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक पलक तिवारीने (Palak Tiwari) भाईजानच्या (Salman Khan) ‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमामधून बॉलीवूडमध्ये (Bollywood) पाऊल टाकले आहे. ती सतत तिच्या बोल्ड अंदाजामुळे अन् तिच्या वक्तव्यांमुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. आता पुन्हा एकदा तिचं एक वक्तव्य जोरदार चर्चेत आले आहे. तिने तिची आई श्वेता तिवारीबद्दल (Shweta Tiwari) एक धक्कादायक विधान केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii)


पलक आणि श्वेता यांचं नातं खूप खास आहे. पलक श्वेताची मुलगी असली तरीही त्या दोघीही एकमेकींसोबत मैत्रिणीप्रमाणे वागत असतात, असा अंदाज त्यांचे चाहते नेहमीच व्यक्त करत असतात. मात्र आता खरी गोष्ट काय हे स्वतः पलकने खुलासा केला आहे. श्वेता तिवारीला ‘देसी आंटी’ म्हणत पलकने आईचा तिच्यावर किती धाक आहे, याचा धक्कादायक खुलासा केला आहे.

एका मुलाखतीमध्ये पलक म्हणाली आहे की, माझी आई एक कूल आई असण्यासोबतच एक ‘देसी आंटी’सारखीही आहे. २० रुपयेही खर्च करण्यासाठी अजून देखील मला माझ्या आईची परवानगी घ्यावी लागते. जर मी काही शॉपिंग केलं तर त्याची किंमत किती हे मला प्रत्येकवेळी याची माहिती द्यावी लागते. जर कधी मला कार्ड वापरून पैसे कोणाला द्यायचे असतील तर त्याचा ओटीपी आईकडे जातो.

ओटीपी देण्याअगोदर आई मला, ती रक्कम तू कुठे खर्च करते आहेस? असं विचारते. तर कधी कधी ती मला पैसे खर्च करण्यावरून खूपच ओरडत असते. मग त्यावेळी तिची समजूत काढावी लागते आणि तोपर्यंत तो ओटीपी एक्सपायर झालेला असतो. मग मला पुन्हा एकदा नवा ओटीपी तिच्याकडे मागावा लागत असल्याचे तिने यावेळी स्पष्ट केले आहे.

Adipurush: ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या वादात अभिनेता प्रभासच्या पोस्टरनं वेधलं लक्ष

तसेच ती पुढे म्हणाली आहे की, जर माझी कधी काही चूक झाली तर ती मला मारत नाही पण अशी नजर देते की ती बघूनच समोरच्या व्यक्तीचा थरकाप उडतो. मग मी तिच्या त्या नजरेकडे पाहूनच म्हणते की, अशी चूक मी पुन्हा करत नाही. पलकचं हे बोलणं आता सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आले आहे. पलकच्या या बोलण्यामुळे श्वेता तिवारीची दुसरी बाजूही चाहत्यांसमोर आली असल्याचे समजत आहे.

Tags

follow us