Amitabh Bachchan यांना मुंबई पोलिसांनी केली अटक? पोलिसांच्या गाडीजवळ उभे असतानाचा फोटो व्हायरल

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 19T144706.032

Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन म्हणजेच चाहत्यांचा लाडका बिग बी यांची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मेगास्टारला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे का? किंवा बिग बी (Amitabh Bachchan) यांनी सोशल मीडियावर खिल्ली उडवण्यासाठी असा प्रकार केला आहे. बिग बी यांनी मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) वाहनासोबतचा फोटो सोशल मीडियावर (Social media) शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये अटक असे लिहिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)


ही पोस्ट पाहून चाहते अनेक अंदाज बांधायला सुरुवात केली आहे. पण शेवटी प्रकरण काय आहे, हे अद्याप कळू शकले नाही. नुकतेच बिग बी यांनी हेल्मेट न घालता बाईक चालवतानाचा एक फोटो शेअर केला होता, ज्यानंतर सोशल मीडियावर चांगलाच गोंधळ झाला होता. आता हे फोटो शेअर करण्यामागे अभिनेत्याचा हेतू काय असेल याचा अंदाज लावणे कठीण झाले आहे. मुंबईतील अनेक भागांमध्ये वाहतूककोंडीची मोठी समस्या निर्माण होत असते.

अनेकदा नोकरदार वर्गाला कामावर पोहोचण्यास देखील उशीर होत असतो. अगदी असाच अनुभव बिग बी यांनाही आला आहे. सिनेमाच्या शूटिंगला वेळेत पोहोचण्यासाठी बिग बी यांनी चक्क एका अनोळखी दुचाकीस्वाराकडे ‘सेटवर सोडतोस का? असे विचारत मदत मागितली आहे. या व्यक्तीच्या बाईकवर बसून ते सेटच्या दिशेने रवाना झाले असल्याचे देखील चाहत्यांना दिसून आले आहेत.

Adipurush: ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या वादात अभिनेता प्रभासच्या पोस्टरनं वेधलं लक्ष

यामुळे त्यांचे सर्व स्तरातून मोठ्या कौतुक होत आहे. त्यानंतर त्यांनी फोटो शेअर करून संबंधित दुचाकीस्वाराचे बिग बी यांनी आभार देखील मानले आहेत. अनोळखी व्यक्तीसोबतच्या बाईक राईडचा फोटो शेअर करत बिग बी लिहितात, ‘धन्यवाद मित्रा! तुझ्यामुळे मी सेटवर लवकर पोहोचू शकलो. मी तुला ओळखत नाही, पण तू मला मोठी मदत केली आहेस. ट्रॅफिकमधून मार्ग काढत तू मला वेळेत सोडला. मी तुझा आभारी आहे.

Tags

follow us