Gori Nagori Attack: ‘बिग बॉस 16’ फेम अभिनेत्रीवर जीवघेणा हल्ला, पोलिसांवर केला गंभीर आरोप

Gori Nagori Attack: ‘बिग बॉस 16’ फेम अभिनेत्रीवर जीवघेणा हल्ला, पोलिसांवर केला गंभीर आरोप

Gori Nagori Attack : राजस्थानमधील लोकप्रिय नृत्यांगणा आणि ‘बिग बॉस’ फेम (Bigg Boss 16) अभिनेत्री गोरी नागोरी (Gori Nagori) सध्या मारहाणी प्रकरणामुळे जोरदार चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे. गोरी नागोरीचा (Gari Nagori Shared Video) व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) प्रचंड व्हायरल होत आहे. (Shares Video) या व्हिडीओत तिने बहिणीच्या लग्नासाठी अजमेरमधील किशनगड येथे पोहोचल्यावर हल्ला कसा झाला आहे याची माहिती दिली आहे. त्यानंतर तक्रार दाखल करण्यासाठी ती पोलिसांकडे गेली असता त्यांनी सेल्फी काढून तिला परत घरी पाठवले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Official_Gori_Nagori (@real_gorinagori)


गोरीने व्हिडीओ शेअर करत सांगितले आहे की, “नमस्कार मित्रांनो, मी तुमची लाडकी गोरी. आज माझ्याबरोबर घडलेला प्रकार कोणासोबत घडू नये. यामुळे मुद्दाम मी हा व्हिडीओ शेअर करत आहे. मित्रांनो, माझ्या बहिणीचे 22 मे रोजी लग्न होतं. मी शहरात राहते आणि मला वडील आणि भाऊ नाही. तर माझा एक मोठा मेहुणा आहे. त्याचं नाव जावेद आहे. त्याने सांगितलं की हे लग्न किशनगडमध्ये करा. मी सर्व व्यवस्था करीन.

गोरीने पुढे देखील असे सांगितले आहे की, मेहुण्याच्या सांगण्यावरुन मी किशनगडमध्ये लग्न केले होते. पण त्यावेळी मला माहिती नव्हतं की हा त्याचा कट होता. किशनगडमध्ये माझ्यासह संपूर्ण टीमवर मेव्हण्याने आणि त्याच्या मित्राच्या भावाने खूप वाईट हल्ला आमच्यावर केला आहे. दरम्यान आम्हाला मारहाण करण्यात आली. तर दुसरीकडे हे घरगुती प्रकरण असल्याचे ते घरीच सोडवा असा सल्ला देखील पोलिसांनी दिला.

पोलिसांनी खूप वेळ तिला बसवून ठेवल्याचा आरोप तिने यावेळी केला आहे. त्यानंतर माझ्याबरोबर सेल्फी काढला आणि घरी जाण्यास सांगितले. गोरी ही मुलगी आहे, तिच्या जीवाचं काय बरं-वाईट झालं तर अशी तिला भीती वाटत आहे. त्यामुळे राजस्थान सरकारने लवकरात लवकर सुरक्षा द्यावी आणि न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती गोरीने यावेळी केली आहे. हरियाणाची ‘शकीरा’ गोरी नागोरीला ‘बिग बॉस’मुळे मोठी लोकप्रियता मिळाली आहे.

‘Raavrambha’ पाहिल्यानंतर प्रसिद्ध मराठमोळ्या दिग्दर्शक महेश टिळेकरांची ‘ती’ पोस्ट चर्चेत

कोण आहे गोरी नागोरी

24 वर्षीय तस्लिमा बानो ही राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील मेरता शहराच्या रहिवासी आहेत, तिला गौरी नागौरी म्हणून ओळखले जाते. नृत्यविश्वातील भारतीय शकीरा म्हणून प्रसिद्ध आहे. तिचे वडील राजस्थान पीडब्ल्यूडीमध्ये नूर मोहम्मद होते. तिचे त्यांच्यावर खूप प्रेम होते. 2010 मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर, ती नैराश्यात गेली आणि एक वर्षासाठी नृत्याच्या जगापासून दूर गेली. या धक्क्यातून ती बाहेर आली आणि पुन्हा नृत्याच्या दुनियेत परतली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube