बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा मोठा निर्णय; मुंबई सोडण्याच्या तयारीत, धक्कादायक कारण…

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा मोठा निर्णय; मुंबई सोडण्याच्या तयारीत, धक्कादायक कारण…

Director Anuraag Kashyap Reveals Leaving Mumbai Soon : बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी (Anuraag Kashyap) मोठा निर्णय घेतल्याचं समोर आलंय. अनुराग कश्यप यांनी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला आहे. नुकताच त्यांनी एका मुलाखतीत हा धक्कादायक खुलासा केलाय. चित्रपट बनवण्याचा उत्साह गमावल्याचं त्यांनी म्हटलंय. यामागे ते कलाकारांच्या टॅलेंट एजन्सींना दोष देत आहेत. ज्यामध्ये एक नवीन ट्रेंड सुरू झालाय, ज्यात कलाकारांना अभिनयाऐवजी स्टार बनण्यावर भर दिला जातोय. चित्रपटसृष्टीतील जोखीम घटक कमी झाल्याबद्दल (Bollywood News) आणि रिमेक बनवण्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केलीय.

अनुराग कश्यप यांनी मुंबई आणि बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतलाय. खुद्द दिग्दर्शकानेच एका मुलाखतीदरम्यान याचा खुलासा केलाय. हिंदी चित्रपटसृष्टीची सध्याची स्थिती पाहून मी वैतागलो, असं देखील अनुराग कश्यप (Bollywood Director) यांनी म्हटलंय.

धक्कादायक! ‘या’ देशाच्या राष्ट्रपतींविरुद्ध अटक वॉरंट जारी; नेमकं काय घडलं?

आजच्या काळात मी बाहेर जाऊन नवीन वेगळ्या प्रकारचा चित्रपट करू शकत नाही, कारण आता सर्व काही पैशावर आलंय. ज्यामध्ये माझे निर्माते फक्त नफा आणि मार्जिनचा विचार करतात. चित्रपट (Anuraag Kashyap Movie) सुरू होण्यापूर्वीच प्रत्येकजण तो कसा विकायचा याचा विचार करतो. त्यामुळे तो चित्रपट बनवण्याची मजा आता संपली आहे. म्हणूनच मी पुढच्या वर्षी मुंबई सोडून दक्षिणेत शिफ्ट होतोय. जिथे प्रत्येकजण काम करण्यास उत्सुक असेल, तिथे मला जायचंय. नाहीतर मी म्हाताऱ्यासारखा मरेन. मी माझ्या स्वतःच्या उद्योगाबद्दल निराश आणि अस्वस्थ झालो आहे. त्याच्या विचाराने मी अस्वस्थ झालोय, असं अनुराग कश्यप यांनी म्हटलंय.

तसेच यावेळी बोलताना अनुराग कश्यप म्हणाले की, पहिल्या पिढीतील कलाकारांसोबत काम करणे खूप अवघड आहे. कारण त्यांना स्टार बनण्याची आवड आहे. पण अभिनय करायचा नाही. एजन्सी सुरूवातीला कोणालाच स्टार बनवत नाही. पण जेव्हा अभिनेता स्टार होतो, तेव्हा ते त्याच्याकडून मोठ्या प्रमाणावर पैसे लुटतात. एक चांगला प्रतिभावान अभिनेता शोधणं हे एजन्सीचं काम आहे. प्रथम ते त्याला पकडतात नंतर स्टार बनवतात.

वाल्मिक कराड 3 दिवस पुण्यात… CID ला कसं कळलं नाही? छत्रपती संभाजीराजेंचे गंभीर आरोप

एजन्सीज कलाकारांना वर्कशॉपमध्ये पाठवत नाही, तर वर्कआउटसाठी जिममध्ये पाठवात. आता हे सर्व फक्त ग्लॅम-ग्लॅम आहे. कारण सगळ्यांनाच सर्वात मोठा स्टार बनायचं आहे, असा आरोप देखील अनुराग कश्यप यांनी कलाकारांवर केलाय. त्यांनी सांगितलं की, एकदा एका अभिनेत्याने एका एजन्सीचे म्हणणे ऐकून आपला चित्रपट सोडला, परंतु नंतर त्याच्याकडे परत आला. कारण त्या एजन्सीने त्याला फसवले होतं. त्यामुळे अनुराग कश्यपने अभिनेता आणि स्टार ट्रिटमेंटच्या महत्त्वावर भाष्य केलं होतं. त्यांनी त्याची तुलना मल्याळम फिल्म इंडस्ट्रीशी केली, जिथे कलाकार वेगळे काम करत नाहीय परंतु एकत्र येऊन एका चित्रपटात काम करतात. ज्यामुळे चित्रपटाचे सौंदर्य आणखी वाढते. हे हिंदी चित्रपटात दिसत नाही.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube