रॉकस्टार डीएसपीने दिवंगत संगीतकार एसपी बालसुब्रमण्यम यांचा व्हिडिओ शेअर करत म्हणाला…
Rockstar DSP On SP Balasubramaniam: संगीतकार (Bollywood ) देवी श्री प्रसाद उर्फ रॉकस्टार डीएसपी (Rockstar DSP) यांनी त्यांच्या सोशल मीडियावर (Social media) दिवंगत दिग्गज संगीतकार एसपी बालसुब्रमण्यम (SP Balasubramaniam) यांचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे, यामध्ये त्यांनी संगीतकाराचे तोंडभरून कौतुक केले आहे. बालसुब्रमण्यम यांनी त्याला चांगल्या हेतूने टॅलेंटला दुसऱ्या स्तरावर नेण्यास सांगितले आहे.
संगीतकार देवी श्री प्रसाद उर्फ रॉकस्टार डीएसपी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर दिवंगत दिग्गज संगीतकार एसपी बालसुब्रह्मण्यम यांचा एक जुना व्हिडिओ शेअर केला. यामध्ये संगीतकाराची स्तुती करताना ऐकयला मिळाले आहे.
“मी नेहमीच सर्वांना सांगितले आहे की, कलाकारामध्ये लाखो चांगले आणि वाईट गुण नेहमीच असतात. परंतु जर त्याचा हेतू चांगला असेल तर तो त्याच्या प्रतिभेला वेगळ्या उंचीवर घेऊन जातात. तो खूप प्रतिभावान आहे. तो खूप चांगला माणूस आहे, म्हणूनच तो व्यावसायिक सिनेमातही उत्तम संगीत करू शकतो. तो एक अतिशय गोड व्यक्ती आहे,” संगीतकार म्हणाले होते, आणि ते आता रॉकस्टारने सिद्ध केले आहे. जो स्वतःची तुलना ‘पुष्पा 2’ संगीतकाराशी करतो,” बालसुब्रह्मण्यम व्हिडिओमध्ये म्हणाले होते.
डीएसपी पोस्ट शेअर करताना लिहिले आहे की, “एसपीबी सरांकडून अशी प्रशंसा आणि आशीर्वाद मिळणे हा किती सन्मान आहे. कामाच्या आघाडीवर डीएसपीकडे एक अद्भुत लाइन-अप आहे. संगीतकाराकडे अल्लू अर्जुन-स्टारर ‘पुष्पा: द रुल’, धनुष-स्टार ‘कुबेरा’, अजित कुमार-स्टार ‘गुड बॅड अग्ली’, विशाल-स्टारर ‘रथनम’ आणि इतर अनेक चित्रपट या वर्षी रिलीज होणार आहेत.
‘छत्रपतींची गादी हा महाराष्ट्राच्या काळजातला विषय’; निवडणूक प्रचारात अपमान झाल्यानं अभिनेता भडकला
कोण आहेत एस. पी. बालासुब्रमण्यम
अभियंता होण्याची स्वप्न पाहणाऱ्या एस. पी. बालासुब्रमण्यम यांनी हौशी गायक म्हणून आपल्या संगीत कारकीर्दीला सुरुवात केली होती. दक्षिणात्य संगीतातील या प्रवासात त्यांना खूपच प्रसिद्धी मिळाली होती. 8 फेब्रुवारी, 1981रोजी सकाळी 9 ते रात्री 9 अशा 12 तासांत तब्बल 21 कन्नड गाणी रेकॉर्ड करत त्यांनी ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये आपले नाव कोरले. या आधी त्यांनी एका दिवसांत 19 तमिळ गाणी तर, हिंदी गाणी रेकॉर्ड करण्याचा अनोखा विक्रम केला होता. प्रतिभावंत गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांचं निधन कोविडच्या काळात झालं होतं.