चित्रांगदा सिंग सलमान खानसोबत ‘बॅटल ऑफ गलवान’मध्ये मुख्य भूमिकेत; दिग्दर्शक अपूर्व लखियाची घोषणा

Chitrangada Singh With Salman Khan in Battle of Galwan : दिग्दर्शक अपूर्व लखिया यांनी आज अधिकृतपणे जाहीर केलंय की, अभिनेत्री चित्रांगदा सिंग (Chitrangada Singh) त्यांच्या आगामी युद्धपट ‘बॅटल ऑफ गलवान’ मध्ये सलमान खान (Salman Khan) यांच्या समवेत मुख्य महिला भूमिकेत झळकणार आहेत. भारत-चीन सीमावादावर आधारित या वास्तव प्रेरित चित्रपटात सलमान आणि चित्रांगदा पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार (Battle of Galwan) असून, त्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
संदीप रेड्डी वांगा पहिल्याच दिवशी पाहणार ‘सैयारा’; अहान अन् अनीत भावूक
गंभीर आणि प्रभावी कथानकांसाठी प्रसिद्ध असलेल्या लखिया यांनी चित्रांगदाच्या अभिनयकौशल्याचे कौतुक करत तिला योग्य निवड असल्याचे सांगितले. “मी ‘हजारों ख्वाहिशें ऐसी’ आणि ‘बॉब बिस्वास’मध्ये तिचे अभिनय पाहून खूप प्रभावित झालो (Entertainment News) होतो. ती संजीवक अभिनय आणि सुसंवादाचे उत्तम उदाहरण आहे,” असं लखिया म्हणाले. “सलमान सरांच्या मूक पण ताकदवान भूमिकेला चित्रांगदाची नाजूक पण ठाम उपस्थिती छान प्रकारे पूरक ठरणार आहे.”
चित्रपटाच्या निर्मितीशी संबंधित सूत्रांनी सांगितले की लखिया अशा अभिनेत्रीच्या शोधात होते जिनच्यात ताकद, भावनिकता आणि नाजूकपणा यांचा योग्य संतुलित मिलाफ असेल – आणि हे सर्व गुण चित्रांगदामध्ये सहज (Salman Khan Movie) दिसले. विशेषतः इंडिया गेटवर घेतलेल्या तिच्या काही छायाचित्रांनी लखिया यांना भारावून टाकले, ज्यामध्ये तिच्या चेहऱ्यावरील सहज भावभावना आणि सौंदर्य या भूमिकेची खरी प्रतिमा दर्शवत होती.
संस्कृतिक पुण्यात चाललयं काय?; दिवस गेलेल्या गर्लफ्रेंडला रबडीतून दिली गर्भपाताची गोळी
‘बॅटल ऑफ गलवान’ या चित्रपटाची निर्मिती लवकरच सुरू होणार असून, यंदाच्या वर्षातील सर्वाधिक प्रतिक्षित चित्रपटांपैकी एक म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. सलमान खानसारखा सुपरस्टार आणि चित्रांगदा सिंग यांची ताज्या जोडीने चाहत्यांमध्ये नवीन उत्साह निर्माण केला आहे.