Devoleena Bhattacharjee: नेटकऱ्यानं शेअर केलेल्या लव्ह जिहादबाबतच्या ट्वीटला देवोलीनाचा सडेतोड उत्तर; म्हणाली…

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 20T124643.132

Devoleena Bhattacharjee: अभिनेत्री देवोलीनानं (Devoleena Bhattacharjee) म्हणजे चाहत्यांची लाडकी गोपी बहू ही काही दिवसांपूर्वी शाहनवाज शेखसोबत (Shahnawaz Sheikh)  लग्नगाठ बांधली. तो धर्माने मुस्लीम असलेल्या शाहनवाजशी विवाहबद्ध झाल्याने देवोलीनाला खूप ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. अजूनही अनेकवेळा तिला यावरून मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Devoleena Bhattacharjee (@devoleena)


आता एका नेटकऱ्याच्या ट्वीटला तिने सडेतोड उत्तर दिले आहे. डॉक्टर प्राची साध्वी यांनी हरिद्वारमध्ये मुलींना मोफत ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) सिनेमा दाखवला गेल्याचे ट्वीट करत सांगितले आहे. यावर एका यूजरने देवोलीनाचं नाव घेत लिहिले आहे की, देवोलीनाला बोलावलं होतं का? तिने या सिनेमामध्ये काम केले आहे, असं विकिपीडिया म्हणतं. हिच्या पतीचे नाव शाहनवाज शेख आहे.

कदाचित तुम्हाला माहीत नसणार आहे की… लव्ह जिहादची ऐशी की तैशी.” नेटकऱ्याच्या या ट्वीटवर देवोलीनाने त्याची शाळा घेतली आहे. नेटकऱ्याच्या या ट्वीटला उत्तर देत तिने सांगितले आहे की, मला बोलवायची त्यांना गरज भासली नाही. ‘द केरला स्टोरी’ हा सिनेमा मी आणि माझा नवरा अगोदरच बघून आलो आहोत. आम्हा दोघांनाही हा सिनेमा आवडला. खरा भारतीय मुस्लीम हे नाव ऐकलं आहे का? माझा नवरा त्याला एक आहे, जो चूकला चूक म्हणण्याची ताकद आणि हिम्मत बाळगतो.

देवोलीनाचे हे ट्वीट आता खूपच चर्चेत येत आहे. या ट्वीटवर कमेंट करत आता नेटकरी अनेक प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान देवोलीना अनेकवेळा समाजातील तिला खटकणाऱ्या किंवा आवडणाऱ्या गोष्टीविषयी ती पडखर मत सोशल मीडियावर मांडत असल्याचे दिसून येत असते.

Adipurush: ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या वादात अभिनेता प्रभासच्या पोस्टरनं वेधलं लक्ष

गेल्या काही दिवसांपूर्वी तिने तिच्या नवऱ्यासोबत ‘द केरला स्टोरी’ हा सिनेमा पाहिला. तिचा नवरा शाहनवाजला त्यात काही आक्षेपार्ह वाटलं नाही, असं ट्वीट तिने केलं होतं. तर त्यानंतर आता ती या नव्या ट्वीटमुळे चर्चेत जोरदार येत आहे.

Tags

follow us