कॅन्सरशी झुंज हरली! प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन, कलाविश्वात शोककळा

Famous Actress Priya Marathe Passes Away : दूरदर्शन, चित्रपट आणि रंगभूमीवर आपल्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री प्रिया मराठे (Priya Marathe) यांचे आज (31 ऑगस्ट) सकाळी निधन झाले. वयाच्या केवळ 38 व्या वर्षी कॅन्सरशी लढा (Famous Actress) देत त्यांनी अखेरची श्वास घेतला. त्यांच्या अचानक जाण्याने कलाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रिया गंभीर आजाराशी झुंज देत होत्या. मात्र, या आजाराशी लढताना त्यांनी कधीही हार मानली नाही. उपचार सुरू असतानाच आज (Entertainment News) त्यांची प्राणज्योत मालवली.
गेल्या काही महिन्यांपासून प्रिया गंभीर आजाराशी झुंज देत होत्या. मात्र, या आजाराशी लढताना त्यांनी कधीही हार मानली नाही. उपचार सुरू असतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली.
कलाविश्वात हळहळ
मराठी व हिंदी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे यांच्या निधनाने कलाविश्वात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांचे वय अवघे 38 वर्ष होते. कर्करोगाशी झुंज देत असताना अखेर आज पहाटे सुमारास मीरा रोड येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रिया यांनी ‘पवित्र रिश्ता’ या लोकप्रिय हिंदी मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यामुळेच त्या घराघरात पोहोचल्या होत्या.
View this post on Instagram
आज संध्याकाळी चार वाजता त्यांचा अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अचानक झालेल्या या दुःखद घटनेने मराठी अन् हिंदी मनोरंजनसृष्टीतील सहकाऱ्यांबरोबरच चाहत्यांमध्येही शोककळा पसरली आहे.
शौचालय बंद, पाणी नाही; संयम सुटला तर रस्त्यावर…मराठा आंदोलक संतापले, प्रशासनाकडून छळ…
सहजसुंदर व्यक्तिमत्त्व
प्रिया मराठे यांनी दूरचित्रवाणीवर अनेक गाजलेल्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केलं. त्यांच्या प्रभावी अभिनयशैलीमुळे त्यांना स्वतंत्र चाहतावर्ग लाभला होता. त्यांनी मराठीसोबतच हिंदी मालिकांमध्येही काम केलं असून, त्यांच्या सहजसुंदर व्यक्तिमत्त्वामुळे त्या घराघरात पोहोचल्या होत्या.
भारतावर नवीन संकट! तेल-गॅस पुरवठा बंद होणार? ट्रम्प यांचे युरोपियन देशांना आदेश…
कलाविश्वात मोठी पोकळी
कलाविश्वातील अनेक कलाकार, सहकारी आणि चाहत्यांनी सोशल मीडियावरून श्रद्धांजली व्यक्त केली आहे. तिच्या मागे आई-वडील, पती आणि इतर आप्तस्वकीय असा परिवार आहे. कलाविश्वात आज एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.