तनुश्री दत्ताला न्यायालयातही झटका ! MeToo प्रकरणात नाना पाटेकरांना दिलासा, कोर्टाचा निर्णय काय ?

  • Written By: Published:
तनुश्री दत्ताला न्यायालयातही झटका !  MeToo प्रकरणात नाना पाटेकरांना दिलासा, कोर्टाचा निर्णय काय ?

Nana patekar me too allegations by Tanushree Dutta Court order: चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान सेटवर लैंगिक छळ केल्याप्रकरणी (MeToo) अभिनेती तनुश्री दत्ताने (Tanushree Dutta) अभिनेते नाना पाटेकर (Nana patekar) यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. परंतु पोलिस तपासात पुरावे आढळून न आल्याने पोलिसांनी बी समरी न्यायालयात दाखल केली होती. एक प्रकारे नाना पाटेकर व इतर तिघांना हा दिलासा होता. याविरोधात तनुश्री दत्ताने याचिका दाखल केली होती. ही याचिका प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी निकाली काढली आहे. नाना पाटेकर यांच्यावरील आरोप 2008 चे आहेत. दत्ता यांनी वेळेत याचिका दाखल केलेली नाही. त्यामुळे त्यांची कोणतीही दखल घेतली जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

टॉयलेट साफ करायचो, गाड्या अन् लाद्या पुसायचो…लक्ष्मण उतेकरांचा संघर्ष आणि जिद्दीचा प्रवास

काय आहे प्रकरण?
हॉर्न ओके प्लीज या चित्रपटाचे 2008 मध्ये शुटिंग सुरू होते. याच चित्रपटात एका गाणं तनुश्री दत्तावर शूट केला जात होते. या शुटिंगदरम्यान नाना पाटेकर यांनी लैंगिक छळ केल्याचा आरोपा तनुश्री दत्ताने केला होता. या प्रकरणी ओशावरी पोलिस ठाण्यात नाना पाटेकर यांच्यासह नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य, सिनेदिग्दर्शक राकेश सारंग आणि निर्माता समी सिद्दीकी यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. 26 मार्च 2008 रोजी शुटिंग सुरू असताना नाना पाटेकर यांचे माझ्यासोबतचे वर्तन बरोबर नव्हते. गाण्यातले त्याचे काम संपल्यावरही ते सेटवर आले होते आणि नाच शिकवण्याच्या बहाण्याने माझा हात धरण्याचा, मला ढकलण्याचा प्रयत्न केला, असे तनुश्रीने फिर्यादीत म्हटले होते.
हे आरोप नाना पाटेकर यांनी फेटाळून लावले होते. पुढे पोलिस तपासात पाटेकर व इतरांविरुद्ध पुरावे आढळून आले नव्हते. त्यामुळे फिर्याद खोटी ठरवून पोलिसांनी ब समरी रिपोर्ट दाखल केला होता.

सर्वोच्च न्यायालयातही पुण्याचं ‘बर्गर किंग’ ठरलं ‘किंग’; ब्रँड नेमला दिली परवानगी

एफआयआर खरी की खोटी सांगू शकत नाही
पोलिस तपासाविरुद्ध तनुश्री दत्ताने याचिका ( प्रोटेस्ट पिटिशन) दाखल केली होती. बी समरी रिपोर्ट फेटाळून लावावा, तपासी अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करावी, पुढील तपास करण्याचे आदेश द्यावेत, हा तपास गुन्हे शाखेकडे द्यावा, अशा मागणी दत्ताने केल्या होत्या. परंतु न्यायालयाने तनुश्री दत्ताची याचिका निकाली काढली आहे. दत्ता यांनी याचिका वेळेत दाखल केलेली नाही. घटनेच्या सात वर्षानंतर याचिका दाखल केली आहे. त्यामुळे फिर्याद ही खरी की की खोटी हे सांगू शकत नाही, असे न्यायालयाने आदेशात म्हटले होते. तसेच निर्माता समी सिद्दीकीविरोधात दाखल केलेला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये सिद्दीकींना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा पुढे तपास होणार नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube