माणसं जेव्हा भावनिकदृष्ट्या दुखावतात, तेव्हा सगळंच शून्य वाटायला लागतं ; नाना पाटेकर

माणसं जेव्हा भावनिकदृष्ट्या दुखावतात, तेव्हा सगळंच शून्य वाटायला लागतं ; नाना पाटेकर

Nana Patekar Exclusive Interview With Letsupp Marathi : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या आगामी वनवास चित्रपटाची (Vanvaas Movie) सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी लेट्सअप मराठीशी दिलखुलास संवाद साधला. या चित्रपटाबद्दल नाना पाटेकर यांनी काय सांगितलं? मुलगा अन् बाप यांच्या नात्याबद्दल काय सांगितलं? कोणाच्या आठवणीत नाना पाटेकर भावूक झाले? नाती जपणारा श्रीमंत माणूस कोण? अशा विविध विषयांवर नाना पाटेकर यांनी लेट्सअपशी संवाद साधला.

यावेळी बोलताना नाना पाटेकर म्हणाले की, आपली जवळची मंडळी निघून जाणं, हाच खरा वनवास आहे. म्हणजे ज्यांच्याबद्दल इतकं प्रेम आहे, मग लक्षात येतं की आपण त्यांच्या गिणतीतच (Nana Patekar Exclusive Interview) नाही. अशी माणसं जेव्हा भावनिकदृष्ट्या दुखावतात, तेव्हा सगळंच शून्य वाटायला लागतं. वनवास या चित्रपटातील व्यक्तिरेखेबद्दल बोलताना नाना पाटेकर म्हणाले की, कथानक हे प्रत्येकाच्या आयुष्यातलं जीवनातलं आहे. तुम्ही मांडता कसं, यावर अवलंबून असतं. सामग्री तिच आहे. मूळ पदार्थ एकच आहे, असं ते म्हणालेत. हे सर्व पात्र महाभारतात येवून गेलेले आहेत, असं नाना पाटेकर म्हणाले आहेत.

फडणवीस सरकारची आतली बातमी फुटली; मंत्रिमंडळातील संभाव्य नावांची यादी समोर

जेव्हा संपूर्ण कुटुंब असताना मानसिक विवंचना होते, मी एकटा आहे असं होतं. त्या खिजगणतीत मी नाहीये, तेव्हा कुठे त्यांचं वानप्रस्थाकडून संन्यासाकडे भ्रमण सुरू होतं. तुम्ही सुन्न होता. हे आयुष्य आहे का? याच्यासाठी जगलो का मी? अतिशय भावनिक असलेली माणसांना काय रूतेल ते माहित नाही. हे पात्र अतिशय हळवं आहे, पण ते बाहेरून दाखवत नाही. वज्रासारखा आहे. ऐरवी तो अतिशय साधा आहे. वाट्याला आलेलं सगळं दु:ख मान्य करणारा आहे. बाजार मांडणारा नाही. त्यामुळे तो हवाहवासा वाटतो. म्हणजे असं की तुम्ही खूप हसत हसत राहणार आणि नकळत केव्हा डोळे वाहायला लागणार, हे तुम्हाला कळणार देखील नाही.

फडणवीस सरकारची आतली बातमी फुटली; मंत्रिमंडळातील संभाव्य नावांची यादी समोर

मागच्या पिढीत शब्दासाठी आयुष्य कु्र्बान करणारी मंडळी होती. आपल्या प्रत्येकामध्ये ताकद आहे की आपण समाजाला काही दिलं पाहिजे, ते आपण देवू शकतो. एकत्र कुटुंबात नाती बांधली जातात. आपण कुठेही असू तिथे आपला रोजगार निर्माण करू शकतो. मला एकटं जगता येईल का? हो येईल, असा तो माणूस आहे. खरं तर आपण एकटे कधीच नसतो, अन् असतोही. यामध्ये आपण निवडायचं. सगळं जमा आहे, खर्च काहीच नाही. प्रत्येक पावलागनिक विवंचना येणारच, पण चालत राहा असं नाना पाटेकर म्हणाले आहेत.

ही गाथा पालक आणि मुले यांचा नातेसंबंध याची आहे. बाकीच्या गोष्टींना आपण इतकं मोठं करून ठेवलंय की, आईबाबांना जावून गच्च मिठी मारावी असं कधी वाटतंच नाही. त्यामुळे मी बापाला शेवटचा केव्हा शिवलास, असं विचारलंय. वडिलांना बाबा थकला का, असं विचारलं तरी तो किती थकला असेल तर नाही म्हणणार. बाप कधीच थकत नाही. हीच खरी गंमत आहे. आपल्याला हे कधी कळत नाही. बाप झाल्यानंतर लक्षात येतं. त्यावेळी उशीर झालेला असतो. बापाला थकायचा अधिकारच आपण कधी दिला नाही. आई थॅंक्यू असं कधी आपण म्हणलोच नाही, कारण तिने ते करायलाचं पाहिजे. यांच्यासारखे देव अजून कोठे मिळणार आहे तुम्हाला? असं नाना पाटेकरांनी विचारलं आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube