पैसे कागदाचे कपटे… जुने होतात, अन्नासारखे आंबतात; नाना पाटेकर
Nana Patekar Letsupp Marathi Exclusive Interview : जेष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचा (Nana Patekar) आगामी चित्रपट वनवास चाहत्यांच्या भेटीला येतोय. यावेळी नाना पाटेकरांनी लेट्सअप मराठीसोबत संवाद साधला. यावेळी नाना पाटेकर म्हणाले की, आम्ही सगळ्यांनी प्रयत्न सोडून दिले आहेत. निराशावादी होवू नका. कुराणात जसा जकात नावाचा प्रकार आहे, ते थोडे पैसे बाजूला काढून ठेवत जा. जेव्हा कुठे गरजू असेल त्याला देवून टाका. कारण हे पैसे माझे नाहीच. लाखातले दोन हजार द्या, असं नाना पाटेकर म्हणाले आहेत. धर्माचं अधिष्ठाण दिल्यानंतरच सगळेच करतात, का दान धर्माच्या पेट्या दुष्काळ पडल्यानंतर का उघडत नाहीत, असा सवाल देखील त्यांनी विचारला (Vanvaas Movie) आहे.
माझ्या दोन टक्क्यात मी या मुलाचं शिक्षण बारावीपर्यंत करेन असं आपण ठरवायचं, हेच नातं यांच्यात जुळतं अन् ते बाप-मुलगा होतात, भांडणं आहेत, त्यांची अगदी मारामारीपर्यंत असं नाना पाटेकर यांनी चित्रपटाविषयी बोलताना सांगितलं आहे.
विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकर; नवनिर्वाचित आमदारांना देणार शपथ
काही लोक अशी असतात, जे दुनियाला मला जवळ करू नका, माझा दुश्वास करा, असं सांगत असतात. खूप सर्वस्पर्शी लेखक, त्याला मोठं व्हायचंच नव्हतं. यश, पैसे, नातेवाईक नको होते. छपन्न वर्ष आम्ही एकत्र होतो, असं नाना पाटेकर यांनी त्यांच्या मित्राविषयी (मंगेश) सांगितलं आहे. सरतेशेवटी नाती जपायची असतात, फार गोड असतात. मी फार श्रीमंत माणूस आहे, नाती जपायलाच पाहिजे असं देखील नाना पाटेकर म्हणाले आहेत. मला तुला जपता येत नसेल, तर तुझ्यासोबत मला बोलण्याचा अधिकार नाही. पण आपल्याकडे तसं नाही, थेट तोडून टाकायचं, असं ते म्हणाले आहेत.
धर्मग्रंथापेक्षा आमच्यासाठी संविधान महत्त्वाचं; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन
नात्यात व्यवहार आला तेव्हा ते संपायला लागला. मंगेश हा माझा मित्र नव्हता, अनेकदा आम्ही एकमेकांची सावली झालेलो आहोत. त्या आठवणीसोबत आपल्याला जगावं लागतं, असंच वनवास चित्रपटात आहे. मला संपल्याचं दु:ख नाही तर तुम्ही जाणीवपूर्वक संपवल्याचं दु:ख आहे, असं देखील नाना पाटेकर म्हणाले आहेत. पण काही नाही होत असतं, हा अॅटिट्यूड त्या माणसाचा आहे. नाम फाउंडेशनच भारतभर काम सुरू आहे. पैसे कागदाचे कपटे असतात. ते जुने होतात, अन्नासारखे आंबतात, वास यायला लागतो. त्यामुळे ते वापरून टाकायचे असतात, असं देखील नाना पाटेकर यांनी लेट्सअप मराठीसोबत बोलताना म्हटलंय.
मला हॉटेलात जेवणं हा भाग पटत नाही. भिंतींची सवय गेली, असं ते म्हणाले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी पु.ल.च्या आठवणींना देखील उजाळा दिला आहे. वनवास चित्रपटामध्ये बाप अन् मुलाची कहाणी पाहायला मिळणार आहे. त्यांच्या नात्यातील गोडवा देखील आपल्याला अनुभवायला मिळणार आहे.