Nitin Desai Death : देसाईंचं 250 कोटींचे कर्ज कोण फेडणार? जाणून घ्या, बँकांचे नियम

  • Written By: Published:
Nitin Desai Death : देसाईंचं 250 कोटींचे कर्ज कोण फेडणार? जाणून घ्या, बँकांचे नियम

Nitin Desai Death : बॉलिवूडचे प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाईंनी गळफास घेत जीवन संपवलं. त्यांच्या या अकाली एक्झिटमुळे मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीसह अनेकांना धक्का बसला आहे. देसाई यांच्यावर कर्जाचा डोंगर होता. या विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणची पोलीस चौकशी सुरू असून, त्यातून अधिक माहिती समोर येईल. देसाई यांच्या निधनानंतर त्यांच्यावरील 250 कोटींचे कर्ज कोण फेडणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जर एखाद्या कर्जदार व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्यावरील कर्ज कोण फेडतं. बँका आणि वित्त कंपन्या कर्जाची रक्कम कशी व कोणाकडून वसूल करतात हे आपण जाणून घेऊया.

Nitin Desai Death : आत्महत्या करण्यापूर्वी देसाईंनी रेकॉर्ड केल्या ऑडिओ क्लिप, चार बिझनेसमनचा उल्लेख

नितीन देसाई यांच्यावर 250 कोटी रुपयांचे कर्ज होते. त्यांनी एका कंपनीकडून 180 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. व्याजासह कर्जाची एकूण रक्कम 250 कोटी झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक ताण आला होता. याच ताणतून त्यांनी जीवनयात्रा संपवल्याचे बोलले जात आहे.

काय आहेत नियम?

कर्ज वसुलीबाबत वेगवेगळे नियम करण्यात आले आहेत. कर्जदाराचा मृत्यू झाल्यास गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जाच्या वसुलीबाबत वेगवेगळ्या पद्धतीने कारवाई केली जाते.

Nitin Desai death : छाया चित्रकार ते एन डी स्टुडिओचे मालक, बहुआयामी व्यक्तिमत्व नितीन देसाई



गृहकर्जाचे नियम काय आहेत?

गृह कर्जासाठी विविध प्रकारचे कायदे करण्यात आले आहेत. एखाद्याला गृहकर्ज घ्यायचे असेल तर त्याला घराची कागदपत्रे गहाण ठेवावी लागतात. यादरम्यान व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी सहकर्जदाराची असते. याशिवाय मयत व्यक्तीच्या वारस जसे मुलगा-मुलगी किंवा नातेवाईक यांचीही कर्जाची रक्कम जमा करण्याची जबाबदारी असते. सहकर्जदार आणि वारसदार कर्जाची परतफेड करू शकत असल्यास, त्यांना ही रक्कम फेडण्याची जबाबदारी दिली जाते.

Nitin Desai: अवघ्या 20 तासांत सजवला होता ठाकरेंच्या शपथविधीचा मंच; नितीन देसाईंच्या विलक्षण कलाकृतीने भारावले होते शिवसैनिक

विशेष बाब म्हणजे बँका आणि फायनान्स कंपन्या सहकर्जदार आणि उत्तराधिकाऱ्याला त्यांची मालमत्ता विकल्यानंतरही कर्जाची परतफेड करण्याचा पर्याय देतात. पण सहकर्जदार आणि वारसांनाही हा पर्याय स्वीकारता येत नसेल, तर बँक कर्जापोटी ठेवलेल्या मालमत्तेचा लिलाव करते. यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून बँक थकबाकीची रक्कम वसूल करते. पण, आता गृहकर्ज देताना बँकांकडून विमा काढला जातो. ज्यात कर्जदार व्यक्तीचा मृत्यू झाल्यास बँक विम्याद्वारे त्याची वसुली करू शकते.

Nitin Desai Suicide: दोन दिवस स्टुडिओतच मुक्काम, घरच्यांशी संपर्क तोडला; अखेरच्या तासांमध्ये नितीन देसाईंसोबत काय घडलं?

पर्सनल लोनबाबत काय सांगतो नियम?

पर्सनल लोन म्हणजेच वैयक्तिक कर्ज होय. पर्सनल लोन आणि होम लोनचे नियम पूर्णतः वेगळे आहेत. वैयक्तिक कर्ज सुरक्षित कर्जाच्या कक्षेत येत नाही. अशा परिस्थितीत कर्जाची परतफेड करण्यापूर्वी कर्जदार व्यक्तीचा मृत्यू झाल्यास बँक त्याऐवजी इतर कोणत्याही व्यक्तीकडून पैसे वसूल करू शकत नाही. विशेष म्हणजे वैयक्तिक कर्जासाठी उत्तराधिकारीदेखील जबाबदार नसतो.

Nitin Desai : एन.डी. स्टुडिओ उभारण्यास कारण ठरला होता हॉलिवूड अभिनेता ब्रॅड पीट…

वाहन कर्जाचे नियम काय ?
होम लोन, पर्सनल लोनबाबत आपण बँकांचे नियम जाणून घेतले. त्यानंतर अनेकजण वाहन कर्ज घेतात. वाहन कर्ज हा एक सुरक्षित कर्जाचा प्रकार आहे. जर एखाद्या व्यक्तीने वाहन खरेदीसाठी कर्ज घेतले आणि त्यादरम्यान त्याचा मृत्यू झाल्यास बँक कुटुंबातील सदस्यांना कर्जाची परतफेड करण्यास सांगते. कर्ज फेडण्यास सांगूनही कर्जाची परतफेड न केल्यास बँक वाहन जप्त करते आणि त्याची विक्री करून कर्जाची रक्कम वसूल करते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube