नितिश कुमारांकडून चित्रपट प्रोत्साहन धोरण मंजूर; महाराष्ट्राच्या चित्रपट उद्योगाला युपीनंतर बिहारचंही आव्हान

नितिश कुमारांकडून चित्रपट प्रोत्साहन धोरण मंजूर; महाराष्ट्राच्या चित्रपट उद्योगाला युपीनंतर बिहारचंही आव्हान

Nitish govt first film promotion policy Challenge Maharashtra film business : बिहार सरकारने (Nitish govt) आज (19 जुलै) राज्याच्या पहिल्या चित्रपट प्रोत्साहन धोरणाला (film promotion policy) मंजुरी दिली आहे. ज्या अंतर्गत चित्रपट निर्मिती संस्थांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. मात्र या निर्णयामुळे महाराष्ट्रातील चित्रपट उद्योगाला (Maharashtra film business) आव्हान निर्माण झालं आहे. तरी या अगोदर उत्तर प्रदेश सरकारने देखील चित्रपट उद्योग उत्तर प्रदेशमध्ये नेण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या.

Women’s Asia Cup: भारताचा पाकवर दणदणीत विजय; स्मृती मानधना, वर्माची स्फोटक खेळी

हे धोरण मंजूर करण्याचा निर्णय मुख्यमंत्री नितेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या अंतर्गत बिहारचा सांस्कृतिक वारसा दाखवणाऱ्या चित्रपटांना यातून मदत मिळणार आहे. त्याचबरोबर इतर भाषांमधील चित्रपटांसाठी देखील कोटींच्या अनुदान देण्यात येणार आहे. ज्यामध्ये भोजपुरी, मैथिली, मगही, अंगिका आणि बज्जिका यासारख्या भाषांचा समावेश आहे.

विधानसभेत महाविकास आघाडीचा चेहरा कोण? नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितले

दरम्यान महाराष्ट्रातील चित्रपट उद्योगाला आव्हान निर्माण झाले आहे. कारण यामुळे महाराष्ट्रात आणि मुंबईत होणारी विविध भाषांमधील चित्रपटांची निर्मीती प्रभावित होऊ शकते. त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण होणारा रोजगार देखील बाहेर जाण्याची शक्यता आहे. अगोदर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी देखील चित्रपटसृष्टी युपीमध्ये हलवण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. त्यानंतर आता बिहार सरकारने देखील महाराष्ट्रातील चित्रपट उद्योगाला आव्हान निर्माण केले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube