Salman Khan: ‘मुलांना वाटते त्यांनी मला मामू बनवले’; भाईजानची भाच्यांसोबत धिंगामस्ती

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 27T161747.393

Salman Khan: सध्या सलमान खान (Salman Khan) म्हणजेच सर्वांचा लाडका भाईजान (Bhaijaan) हा आयफा अवॉर्ड 2023 मध्ये सहभागी होण्यासाठी सध्या दुबईमध्ये आहे. दरम्यान, अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडिया (Social media) अकाउंटवर एक क्यूट व्हिडिओ शेअर (Video share)केला आहे. या व्हिडिओत भाईजान हा त्याची बहीण अर्पिता खानच्या मुलांसोबत धिंगामस्ती घालत असल्याचे दिसून येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)


तसेच या व्हिडिओत भाईजान हा त्याचा भाचा अहिल आणि भाची आयतला एका कार्टमधून गॅलरीमधून घेऊन जात असल्याचे दिसून येत आहे. यावेळी तो ब्लॅक स्पोर्टी लूकमध्ये अतिशय रोमँटिक दिसून येत आहे. या व्हिडिओ शेअर करत असताना भाईजानने ‘मुले मला मामू बनवत आहेत, असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. त्यांना माहित नाही की मामू सध्या कार्डिओ करत आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावर भाईजानच्या चाहत्यांनी खूप मोठ्या प्रमाणात कॉमेंट्स करत आहेत.

भाईजानसोबत त्याची बहीण अर्पिता खान देखील आयफा पुरस्कार सोहळ्यामध्ये सहभागी झाली होती. भाईजानने त्याच्या इंस्टाग्रामवर अर्पिताबरोबर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये भाईजान आपल्या बहिणीसोबत आयफा एन्जॉय करत असल्याचे दिसून आला आहे. अर्पिताच्या पाठीमागे उभे राहून भाईजान नाचत असल्याचे देखील दिसून आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)


‘टायगर 3’मध्ये भाईजान दिसणार

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर नुकताच भाईजानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. आता त्याचा पुढचा आगामी सिनेमा ‘टायगर 3’ आहे. ज्यामध्ये तो इमरान हाश्मी आणि कतरिना कैफसोबत दिसून येणार आहे. हा सिनेमा या वर्षी नोव्हेंबरमध्ये रिलीज होणार असलायची चर्चा सुरु आहे. यात किंग खानही छोट्या भूमिकेमध्ये दिसून येणार आहे.

‘Raavrambha’ पाहिल्यानंतर प्रसिद्ध मराठमोळ्या दिग्दर्शक महेश टिळेकरांची ‘ती’ पोस्ट चर्चेत

तसेच अबुधाबी मध्ये नुकताच यंदाचा आयफा सोहळा संपन्न झाला आहे. (IIFA 2023 Viral Video) बॉलिवूड स्टार्सची या सोहळ्याला मोठ्या प्रमाणात हजेरी होती. दरम्यान यामध्येच सलमान खान (Salman Khan) म्हणजेच भाईजान (Bhaijaan) आणि विकी कौशल (Vickey Kaushal) समोरासमोरून येत असताना भाईजानच्या सिक्युरिटी टीमने विकीला त्याच्या मार्गातून दूर करत असल्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली आहे. यावर विकीने खुलासा केला आहे.

 

Tags

follow us