लॉरेन्स बिश्नोईचा मला मारण्याचा कट, कुटुंबालाही धोका; सलमानचा पोलिसांसमोर मोठा दावा

लॉरेन्स बिश्नोईचा मला मारण्याचा कट, कुटुंबालाही धोका; सलमानचा पोलिसांसमोर मोठा दावा

Salman Khan claim Lawrence Bishnoi kill him to police : गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खान (Salman Khan) यांच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणाची सध्या मुंबई पोलिसांकडून (police) कसून चौकशी सुरू आहे. याच दरम्यान सलमानने पोलिसांकडे नुकत्याच नोंदवलेल्या जबाबमध्ये म्हटला आहे की, लॉरेन्स बिश्नोईने (Lawrence Bishnoi) यानेच हा गोळीबार केला होता तसेच त्याचा मला आणि माझ्या परिवाराला मारण्याचा हेतू आहे असंही यावेळी सलमान खान म्हणाला.

नेमकं प्रकरण काय आहे?

14 एप्रिल रोजी दोन दुचाकीस्वारांनी सलमानच्या वांद्रा येथील घरावर गोळीबार केला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तपासचक्र फिरवले असता संबंधित दोन्ही सामान्य ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर या प्रकरणी सलमानसह त्याच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. दरम्यान सध्या प्रकरणी सहा आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. तसेच न्यायालयाने नोंदवलेल्या निरीक्षणानुसार या सर्व आरोपींविरोधात आवश्यक रेकॉर्ड आणि पुरावे देखील प्राप्त झाले आहेत. त्यामुळे सध्या प्रकरणावर मुंबईतील विशेष न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे. याच दरम्यान सलमानच्या जबाब नोंदवण्यात आला आहे.

ध्रुव राठी पुन्हा अडचणीत, ‘त्या’ प्रकरणात समन्स जारी, जाणून घ्या सर्वकाही …

पोलिसांकडून दोषारोपपत्रात धक्कादायक खुलासे

सलमानच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी तपास करत असलेल्या मुंबई पोलिसांनी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या लॉरेन्स बिश्नोई टोळीतील पाच आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिष्णोई टोळीने भाईजानला मारण्यासाठी 25 लाख रुपयांची सुपारी दिल्याची माहिती पोलिसांनी सांगितली आहे.

इंडियन ऑईलमध्ये ‘या’ पदांसाठी बंपर भरती सुरू, महिन्याला मिळणार 1 लाखांहून अधिक पगार…

पाकिस्तान आणि तुर्कीमधून एके 4, एके 92 आणि एम 16 ही शस्त्रे विकत घेत संपूर्ण प्लॅनिंग करण्यात होती. शिवाय, गायक सिद्धू मुसावाला याची हत्या ज्या शस्त्राने करण्यात आली होती, तेच मेड इन तुर्की शस्त्र देखील खरेदी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Government Schemes : महाराष्ट्र राज्यातील वृध्द साहित्यिक अन् कलावंतांना मानधन योजना

या कालावधीत सलमानच्या हत्येचा कट आखण्यात आला होता, असे पोलिसांनी आरोपपत्रात सांगितले आहे. पोलिसांनी सांगितले की, जवळपास 60 ते 70 लोक सलमानच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवलेले होते. हे सर्वजण सलमान खानचे मुंबईतील घर, पनवेलच्या फार्म हाऊस आणि गोरेगावमधील फिल्म सिटी येथील प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवलेले होते. असं यामध्ये म्हटलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube