लष्करी ऑफिसर असल्याचं भासवून प्रसिद्ध अभिनेत्याची फसवणूक; लावला इतक्या हजारांचा चुना
Fraud With Rakesh Bedi: टीव्ही आणि बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेते राकेश बेदी (Rakesh Bedi) नुकतेच फसवणुकीचे शिकार ठरले आहेत. ‘गदर 2’ (‘Gadar 2) फेम अभिनेत्याला तब्बल 75 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणाची अभिनेत्याने पोलिसांकडे (Police) तक्रार केली आहे. या प्रकरणी सदर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका मुलाखतीमध्ये या भामट्या व्यक्तीने आपण लष्करी अधिकारी असल्याचे सांगून अभिनेते राकेश बेदी यांच्याकडून हजारो रुपयांचा चुना लावला आहे. आपल्यासोबत हा प्रकार नेमका कसा घडला, याची माहिती अभिनेत्याने दिली आहे.
राकेश बेदी यांनी ओशिवरा पोलिस ठाण्यामध्ये (Oshiwara police station) फसवणुक झाल्याची तक्रार दाखल केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, त्यांनी सांगितले की, मोठ्या नुकसानीतून वाचलो आहे. लष्कराच्या नावावर फसवणूक करणाऱ्या अशा फसवणूक करणाऱ्यांना भामट्यांपासून टाळावे असे मला वाटते.
काय आहे संपूर्ण प्रकरण? राकेश बेदी यांना भारतीय लष्करातील असल्याचा दावा करणाऱ्या एका भामट्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितले की, त्यांना त्यांच्या पुण्यातील फ्लॅटमध्ये रस आहे. आपली फसवणूक झाल्याचे राकेश बेदी यांच्या लक्षात येईपर्यंत त्यांनी त्या व्यक्तीच्या खात्यात 75 हजार रुपये ट्रान्सफर केले होते. असे लोक रात्रीच्या वेळी फोन करतात असे त्यांनी सांगितले. जेणेकरून आपली फसवणूक झाल्याचे कोणाच्या लक्षात आले तरी तक्रार दाखल करण्यास उशीर होतो.
राकेशने पोलिसांना फसवणूक करणाऱ्याशी संबंधित तपशील जसे की त्याचे नाव, बँक खाते क्रमांक, फोटो आणि व्यवहाराचे तपशील दिले आहेत. राकेशच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी त्यांना सांगितले की, असे प्रकार अनेक दिवसांपासून होत आहेत. सुदैवाने मी जास्त पैसे गमावले नाहीत.
‘चर्चा तर होणारच! आयराच्या हळदीला रीना दत्ता अन् किरण राव यांच्या मराठमोळ्या लूकनं वेधलं लक्ष!
टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध चेहरा: राकेश गेल्या 4 दशकांपासून पडद्यावर दिसत आहेत. त्यांनी चश्मे बद्दूर, खट्टा मीठा आणि प्रोफेसर की पडोसन यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. शिवाय राकेशने ये जो है जिंदगी, श्रीमान श्रीमती यांसारख्या अनेक टीव्ही मालिकांमध्येही आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. उत्कृष्ट कॉमिक टायमिंग असलेल्या अभिनेत्यांमध्ये राकेशची गणना होते.