Drishyam जाणार सातासमुद्रापार! आता बनणार कोरिअन रिमेक; ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये घोषणा
Drishyam : भारतीय प्रॉडक्शन हाऊस पॅनोरमा स्टुडिओ आणि दक्षिण कोरियाच्या अँथॉलॉजी स्टुडिओने कान्स 2023 सिनेमा महोत्सवाच्या दरम्यान भागीदारीची मोठी घोषणा केली. (Drishyam Franchise Remake In Korea ) घोषणेच्या वेळी निर्माते कुमार मंगत पाठक आणि जय चोई उपस्थित होते. (Ajay Devgn) या भागीदारीचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे ‘दृश्यम’ (Drishyam) या थ्रिलर फ्रँचायझीचा कोरियन भाषेमध्ये रिमेक होणार आहे. (Cannes Film Festival 2023) आंतरराष्ट्रीय भाषेमध्ये ‘दृश्यम’चा रिमेक बनवण्याची ही दुसरी वेळ आहे.
View this post on Instagram
याअगोदर ‘शीप विदाऊट अ शेफर्ड’ या नावाने चायनीजमध्ये याचा रिमेक करण्यात आला होता. ‘दृश्यम’ या सिनेमाचा कोरिया रिमेक आणि अँथॉलॉजी स्टुडिओबरोबरच्या भागीदारीविषयी बोलताना कुमार मंगत म्हणाले आहे की, ‘दृश्यमचा रिमेक कोरियामध्ये बनत असल्याने मी खूप उत्साहित आहे. यामुळे भारताबाहेर त्याचा आवाका तर वाढणार आहेच, शिवाय हिंदी सिनेमाची दखल संपूर्ण जगभरात घेतली जाणार आहे.
इतकी वर्षे आपण कोरियन सिनेमा बघून सर्वाना मोठी प्रेरणा घेतली आहे. आता त्यांना आपल्या सिनेमातून प्रेरणा मिळत आहे. भारतीय सिनेमासृष्टीसाठी यापेक्षा मोठी अभिमानास्पद बाब कोणती असू शकणार आहे. मल्याळम क्राईम थ्रिलर दृश्यममध्ये मोहनलाल मुख्य भूमिकेमध्ये असणार आहे, जो आयजीच्या मुलाच्या हत्येचा संशयित आहे आणि स्वतःला आणि त्याच्या कुटुंबाला पोलिसांपासून वाचवण्यासाठी त्याच्या बुद्धीच्या जोरावर एक मास्टरप्लॅन आखत आहे.
Kushal Badrike: ‘तू परत येशील तेव्हा…’ अमेरिकेला निघालेल्या बायकोसाठी कुशल बद्रिकेची खास पोस्ट
पहिला सिनेमा 2013 मध्ये आला होता, जो जीतू जोसेफ याने लिहिलेला आहे. तसेच त्याचे दिग्दर्शित देखील केले होते. नंतर या सिनेमाचा चार वेगवेगळ्या भाषांमध्ये रिमेक करण्यात आला आहे. हिंदीमधील रिमेकमध्ये अजय देवगण, तब्बू, श्रिया सरन, अक्षय खन्ना यांनी काम केले आहे. याच्या दुसऱ्या भागात देखील हिंदी रिमेकलाही आपल्याइथे मोठा प्रतिसाद मिळाला आहे.