Swara Bhasker Post: स्वरा भास्करची सवतीबद्दलची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाली…

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 27T104917.349

Swara bhasker Post: बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara bhasker ) कायम तिच्या बेधडक वक्तव्याने सतत चर्चेत असते. गेल्या काही महिन्याअगोदरच स्वराने समाजवादी पक्षाचे नेते फहद अहमदबरोबर (Fahad Ahmad) लग्न बंधनात अडकली आहे. लग्नानंतर स्वरा भास्करने एक इन्स्टाग्राम (Swara Bhasker Instagram) पोस्ट टाकली आहे. या पोस्टनंतर अनेकांच्या चाहत्यांचे भुवया उंचावल्या आहे. तर परत एकदा स्वरा जोरदार चर्चेत आली आहे. स्वराने पोस्ट करत तिच्या सवतीविषयी माहिती दिली आहे. स्वराच्या पोस्टवर अनेकांनी मजेदार कमेंट देखील केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)


काय आहे नेमकं पोस्टमध्ये?
स्वरा भास्कर सोशल मीडियावर कायम अॅक्टिव्ह असते. राजकारणावर प्रतिक्रिया असो किंवा तिच्या खासगी आयुष्यातील काही क्षण असो, ती कायमच सोशल मीडियावर आपले मत व्यक्त करत असते. अलीकडेच तिने केलेली एक पोस्ट सर्व चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. यामध्ये स्वराने तिच्या नवऱ्याच्या म्हणजेच फहद अहमदच्या खऱ्या बायकोचा उल्लेख केला आहे.

एवढेच नव्हेतर वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. पण स्वराने असा उल्लेख करण्या पाठीमागचं कारण कळताच तुम्हालाही हसू आल्याशिवाय राहणार नाही. स्वराने इन्स्टाग्रामवर आणि ट्विटरवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती तिच्या पतीच्या खऱ्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना दिसून आली आहे. आता ती खरी पत्नी म्हणजेच फहदचा जीवलग मित्र आहे. स्वराने फहादचा बेस्ट फ्रेंड अरीश कमरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यावेळी तिने त्याची खरी पत्नी असा उल्लेख करत पोस्ट केली आहे.

‘Raavrambha’ पाहिल्यानंतर प्रसिद्ध मराठमोळ्या दिग्दर्शक महेश टिळेकरांची ‘ती’ पोस्ट चर्चेत

स्वराने वाढदिवसाचे फोटो शेअर करत असताना मजेशीर कॅप्शन देखील लिहले आहे. आमचे मित्र, कॉमरेड आणि फहादचा खरा जीवनसाथी अरीश कमरला जन्मदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा, नेहमीच आमची साथ देण्यासाठी आणि सुरुवातीपासून आमच्याबरोबर राहण्यासाठी धन्यवाद. आम्ही कोर्टात कादगपत्रे नीट जमा केली आहेत की नाही याची खातरजमा करण्यापर्यंत ते आमच्या नात्याचे साक्षीदार होण्यापर्यंत आणि आत्तापर्यंतची सर्वात बेस्ट सवत होण्यासाठी धन्यवाद, असं स्वराने त्या पोस्टमध्ये लिहले आहे. अरीश कमर आणि फहद अहमद खूप जवळचे आणि चांगले मित्र आहेत.

स्वरा आणि फहदच्या लग्नामध्ये तो मोठ्या उत्साहाने सहभागी झाला होता. मग ते कोर्ट मॅरेज असो किंवा लग्नाचे इतर फंक्शन अरीश सर्व कार्यक्रमामध्ये सहभागी झाला होता. इतकंच नव्हे, तर, स्वरा-फहदच्या कोर्ट मॅरेजच्या वेळेस देखील तो साक्षीदार म्हणून त्याने सही देखील केली होती. स्वरा भास्कर आणि फहद अहमदने फेब्रुवारी महिन्यामध्ये लग्नगाठ बांधली होती. फहद अहमद हा एका समाजवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष काम पाहतो.

Tags

follow us