Tiger Nageswara Rao: रवी तेजाच्या ‘टायगर नागेश्वर राव’ या सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 25T134651.809

Tiger Nageswara Rao First Look: तेलुगू सुपरस्टार रवी तेजा (Ravi Teja) यांचा मोस्ट अवेटेड सिनेमा ‘टायगर नागेश्वर राव’चे (Tiger Nageswara Rao) पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह बघायला मिळत आहे. या सिनेमात जबरदस्त अॅक्शन ड्रामा चाहत्यांना बघायला मिळणार आहे.

या सिनेमात बॉलिवूड स्टार्स देखील दिसणार आहेत. या सिनेमात नुपूर सेनन मुख्य भूमिकेत चाहत्यांना दिसणार आहे. टायगर नागेश्वर राव हा सिनेमा एका प्रसिद्ध चोराचा बायोपिक आहे. या सिनेमामध्ये रवी तेजाची वेगळी व्यक्तिरेखा बघायला मिळणार आहे. सिनेमातील त्याची देहबोली, बोलण्याची पद्धत, कपडे घालण्याची पद्धत सर्व काही वेगळे असणार आहे.

सिनेमाचे पोस्टर रिलीज झाल्यावर लोकांची सिनेमाबद्दलची मोठी उत्सुकता आणखीनच वाढली आहे. या सिनेमाच्या टीझरला जॉन अब्राहमने आपला आवाज देण्यात आला आहे. जॉन अब्राहमचा दमदार आवाज या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनमध्ये ऐकायला मिळणार आहे. रवी तेजा व्यतिरिक्त प्रवीण दाचाराम, रेणू देसाई, मांडवा साई कुमार आणि राजीव कुमार अनेजा या सिनेमात मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहेत.

‘The Kerala Story’ वरून सुरू असलेल्या वादावर कंगना रनौत पुन्हा उचकली; म्हणाली, “असे चित्रपट…”

हा सिनेमा 20 ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात 5 सुपरस्टार, तेलगूमधील व्यंकटेश, कन्नडमधील शिवा राजकुमार, हिंदीतील जॉन अब्राहम, तामिळमधील कार्ती आणि मल्याळममधील दुल्कर सलमान हे एकत्र येत आहेत. रवी तेजा टायगर नागेश्वर रावची भूमिका साकारणार आहे.

Tags

follow us