‘The Kerala Story’ फेम अभिनेत्री योगिता बिहानीचं मोठं गौप्यस्फोट; म्हणाली, ‘हा इस्लाम नाही…’

‘The Kerala Story’ फेम अभिनेत्री योगिता बिहानीचं मोठं गौप्यस्फोट; म्हणाली, ‘हा इस्लाम नाही…’

The Kerala Story: सुदीप्तो सेन (Sudipto Sen) दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) हा सिनेमा रिलीज होण्याअगोदरच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. सिनेमा प्रदर्शित होताच काही लोकांनी त्यावर टीका करायला सुरुवात केली. राजकीय संघटनांकडून या सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी होत होती. सिनेमाची कथा धर्मांतर केलेल्या चार महिलांची आहे, ज्यांना दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील करण्यात आले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yogita Bihani (@iyogitabihani)


या सिनेमाला काही लोकांनी प्रचंड विरोध केला, तर सामान्य लोकांनी हा सिनेमा उचलून धरला. मध्यंतरी या सिनेमाच्या संपूर्ण टीमने पीडित मुलींनसोबत घेऊन एक पत्रकार परिषद घेतली, ज्यामध्ये बऱ्याच गोष्टींचा त्यांनी उलगडा केला आहे. तेव्हा सिनेमाचे निर्माते विपुल अमृतलाल शाह यांनी देखील या पाठीमागील विचार मांडले होते. आता नुकतंच या सिनेमा ‘निमा’ या ख्रिश्चन मुलीचे पात्र साकारणारी अभिनेत्री योगिता बिहानी (Actress Yogita Bihani) हिने या सिनेमाला होणाऱ्या विरोधाबद्दल मोठं गौप्यस्फोट केली आहे.

‘फ्री प्रेस जर्नल’शी संवाद साधत असताना योगिता म्हणाली आहे की, मी विपुल सर यांच्या मताशी सहमत आहे. हा सिनेमा प्रत्येकानेच बघायला हवा. आम्ही यामध्ये एका हिंदू मुलीची आणि एक ख्रिश्चन मुलीची कहाणी दाखवली आहे. हा विषयच एवढा गंभीर आहे की, देशातील कानाकोपऱ्यांत हा सिनेमा दाखवला गेला पाहिजे. केवळ महिलाच नव्हे तर पुरुषांना देखील कट्टर बनवण्याचा कट रचला जात आहे. हा इस्लाम नाही, आतंकवाद आहे. योगिताचे सिनेमातील काम बघून तिला धमक्या येत असल्याचे तिने स्पष्ट केले आहे, पण याकडे तिने दुर्लक्ष केलं आहे. सिनेमा बघून बऱ्याच लोकांनी तिचं कौतुक केल्याचे देखील तिने या मुलाखतीमध्ये सांगितले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yogita Bihani (@iyogitabihani)


तसेच सुदीप्तो सेन यांची सतत होत असलेल्या प्रवासामुळे त्यांची तब्येत बिघडली आहे. यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच सिनेमाचे प्रमोशनही थांबवण्यात आले आहे. अनेक दौरेही रद्द करण्यात आले आहेत. सुदीप्तो सेन यांनी रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर १० शहरांमध्ये ‘द केरला स्टोरी’चा प्रचार करण्याची योजना आखली होती.

Kiran Mane Post: किरण माने यांची गौतमी पाटीलसाठी ‘ती’ पोस्ट चर्चेत; म्हणाले, ‘तू पाटलीण…’

सिनेमाने आत्तापर्यंत भारतात २१६.०७ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर सिनेमाने २५० कोटीपेक्षा जास्तीचा गल्ला कमावला आहे. सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरल स्टोरी’ या सिनेमाच्या प्रदर्शनावर काँग्रेससह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची युवा शाखा DYFI आणि इंडियन युनियन मुस्लीम लीग (IUML)च्या युथ लीगने बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. तर अनेक जण या सिनेमाला ‘प्रोपगंडा सिनेमा’ म्हणत असल्याचे सांगितले जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube