Uorfi Javed: ‘इतक्या खालच्या थराला..’, आपल्या फॅशनने सर्वांना चकित करणारी उर्फी कुस्तीपटूंसाठी थेट मैदानात

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 29T135455.837

Uorfi Javed: नव्या संसद भवनाच्या ऐतिहासिक उद्घाटन सोहळय़ापासून अवघ्या ३ किलोमीटर अंतरावर जंतर- मंतर येथे सुरू असलेल्या कुस्तीगिरांच्या आंदोलनाची हिंसक पद्धतीने सांगता झाली आहे. ‘महिला महापंचायत’ (Mahila Mahapanchayat) भरविण्यासाठी संसद भवनाकडे निघालेल्या कुस्तीगिरांची पोलिसांनी (Police) चांगलीच धरपकड केली आहे. त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

ऑलिम्पिक विजेते कुस्तीगीर बजरंग पुनिया, साक्षी मलिक, संगीता फोगट तसेच विनेश फोगट यांच्याबरोबर आंदोलनाच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संगीता फोगट आणि विनेश फोगट यांचा पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर एक फोटो देखील सोशल मीडियावर (social media) जोरदार व्हायरल होत आहे. (Uorfi Javed) त्या फोटोमध्ये त्या हसत असल्याचे दिसून आली आहे. हा फोटो एआयच्या माध्यमातून बनवण्यात आला असल्याचा दावा देखील केल्याचे सांगण्यात येत आहे.

यामुळे एकंदरच हे वातावरण खूपच तापलं जात आहे. कुस्तीगिरांच्या या आंदोलनाला काही सेलिब्रिटीजनी देखील मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला होता. आता अशातच मॉडेल अभिनेत्री उर्फी जावेद ही देखील आता उडी मारली आहे. या फोटोबद्दल ट्वीट करत उर्फीने सांगितलं आहे की, “लोक स्वतःचं खोटं पटवून देण्यासाठी अशा फोटोसोबत का छेडछाड करत असतात? एखाद्याला चुकीचं सिद्ध करण्यासाठी इतक्या खालच्या थराला जाणं आणि खोट्याचा आधार घेणं योग्य नसल्याचे यावेळी तिने सांगितले आहे.

राघव-परिणीती ‘या’ ठिकाणी अडकणार विवाह बंधनात; जोडपे वेंडिंग डेस्टिनेशल फायनल करण्यासाठी निघाले

या ट्वीटसोबत तिने पोलिसांनी केलेल्या कारवाईचा एक व्हिडीओही शेअर करण्यात आला आहे. बजरंग पुनिया यांनी देखील हा फोटो शेअर केला आहे. आयटी सेलची लोकं हा फेक फोटो पसरवत आहेत आणि ज्याने हा फोटो एडिट करून पोस्ट केला आहे, त्याच्या विरोधामध्ये कारवाई होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे, असं या कुस्तीगिरांनी स्पष्ट केले आहे. केवळ उर्फीच नव्हे तर कमल हासन, पूजा भट्ट, विद्युत जामवाल यांच्या सारख्या कलाकारांनी देखील कुस्तीगिरांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

Tags

follow us