IIFA Viral Video: ‘भाईजानच्या सिक्युरिटीकडून गैरवर्तवणुकीवर’; अभिनेत्याचा खुलासा

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 27T110908.356

Salman Khan-Vickey Kaushal: अबुधाबी मध्ये नुकताच यंदाचा आयफा सोहळा संपन्न झाला आहे. (IIFA 2023 Viral Video) बॉलिवूड स्टार्सची या सोहळ्याला मोठ्या प्रमाणात हजेरी होती. दरम्यान यामध्येच सलमान खान (Salman Khan) म्हणजेच भाईजान (Bhaijaan) आणि विकी कौशल (Vickey Kaushal) समोरासमोरून येत असताना भाईजानच्या सिक्युरिटी टीमने विकीला त्याच्या मार्गातून दूर करत असल्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली आहे. यावर विकीने खुलासा केला आहे.

अशा प्रकारांमध्ये तुम्हांला व्हिडिओमध्ये जे दिसतं तसंच असतं असं नाही. याबाबत वायफळ बडबड करण्यात काहीच अर्थ नाही. असं म्हणत त्याने भाईजान आणि विकीमध्ये सारं आलबेल असल्याचे गटयाने यावेळी सांगितले आहे. त्याच घटनेनंतर पुन्हा जेव्हा भाईजान विकीला भेटला तेव्हा त्याने विकीला घट्ट मिठी देखील मारल्याचे पहायला मिळालं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by LetsUpp Marathi (@letsupp.marathi)


नेमकं काय घडलं?

भाईजान आणि विकी कौशल यांच्या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, विकी कौशल चाहत्यांसोबत सेल्फी काढत आहे, त्याच दरम्यान भाईजानचा ताफा तिथे पोहोचतो. भाईजान हा अनेक बॉडीगार्ड्ससोबत तिथे येतो. त्या दरम्यान, विकी भाईजान शेक हँड करण्याचा प्रयत्न करतो, मात्र भाईजान त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. त्यानंतर भाईजानचा सिक्युरिटी गार्ड विकीला ढकलतो.

विकी आणि भाईजान यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओला कमेंट करुन काही नेटकऱ्यांनी भाईजानच्या वागणुकीवर टीका केली आहे. व्हायरल व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, ‘विकी हा सलमानला शेक हँड करत होता पण भाईनं इग्नोर केलं’ तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, ‘हा जर विकी कौशल आहे का? जर असेल तर त्याला का बाजूला केले? दोघेही एकमेकांना भेटू शकले असते.’

‘Raavrambha’ पाहिल्यानंतर प्रसिद्ध मराठमोळ्या दिग्दर्शक महेश टिळेकरांची ‘ती’ पोस्ट चर्चेत

भाईजान आणि विकीचे आगामी सिनेमा

भाईजान हा लवकरच टायगर-3 या सिनेमामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमात भाईजानसोबतच कतरिना कैफ देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. तर विकी कौशलचा ‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपट 2 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. विकी आणि सारा अली खानसोबतच या सिनेमात राकेश बेदी, शारीब हाश्मी, नीरज सूद हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या सिनेमाची प्रेक्षक मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

Tags

follow us