मोठी बातमी ! सूर्यनगरी एक्स्प्रेसचे 11 डब्बे रुळावरून घसरले
राजस्थान : वांद्रे टर्मिनस-जोधपूर सूर्यनगरी एक्स्प्रेसचे 11 डब्बे आज पहाटे जोधपूर विभागातील राजकियावास-बोमदरा सेक्शन दरम्यान रुळावरून घसरले. उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणाले की, ट्रेन रुळावरून घसरल्याने 11 बोगी प्रभावित झाल्या आहेत, या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र 3 प्रवासी जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान या ट्रेनमध्ये 150 स्काऊट गाईड विद्यार्थीही होते, जे पाली येथील जांबोरी येथे जात होते. जोधपूरहून अपघातग्रस्त मदत गाडी घटनास्थळी पाठवण्यात आली आहे. सूर्यनगरी एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि अडकलेल्या प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी नेण्यासाठी बसेसची व्यवस्था केली. यासोबतच रेल्वेने हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत.
रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण होईपर्यंत हा मार्ग ब्लॉक करण्यात आला आहे. तसेच सध्या चार एक्सप्रेसचे मार्गही बदलण्यात आले आहेत. या शिवाय प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाचे उच्चअधिकारी घटनास्थळी रवाना होत आहे. अपघाताच्या कारणांची चौकशी करण्यासाठी हे अधिकारी घटनास्थळी येणार आहे.
हेल्पलाइन नंबर जारी
जोधपूर: 0291- 2654979(1072), 0291- 2654993(1072), 0291- 2624125, 0291- 2431646