व्हिसाच्या नव्या नियमांमुळे 19 राज्यांचा ट्रम्प यांना घरचा आहेर; शुल्क वाढी विरोधात ठोठावला कोर्टाचा दरवाजा
Donald Trump यांच्या एच वन बी व्हिसावर शुल्काविरोधात अमेरिकेतील 19 राज्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.
19 State in court agaist Donald Trump due to New Norms about Visa : जानेवारी 2024 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दुसरा कार्यकाळ सुरू झाला. त्यानंतर त्यांनी ज्या काही प्रशासकीय निती नव्याने अवलंबल्या हे सर्व नियम वादग्रस्त ठरत आहेत. ज्यामध्ये ज्या राज्यांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाची सत्ता आहे. त्या ठिकाणी त्यांच्या अनेक नियमांना विरोध होत आहे. त्यातील एक नियम म्हणजे एच वन बी व्हिसावर ट्रम्प यांनी एक लाख डॉलर एवढं शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्या विरोधात अमेरिकेतील 19 राज्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. ज्यामध्ये कॅलिफोर्निया न्यूयॉर्कसह इतर राज्यांचा समावेश आहे
मेस्सीच्या कार्यक्रमातील राड्यानंतर ममता बॅनर्नीजींचा माफीनामा अन् थेट चौकशीचे आदेश
या राज्यांने दावा केला आहे की, एच वन बी व्हिसा हा अमेरिकेतील कंपन्यांना लागणारे विदेशी कर्मचारी नियुक्त करण्यासाठी महत्त्वाचा ठरतो हा विजा अमेरिकेच्या श्रम विभागाकडून दिला जातो. मात्र ट्रम्प यांनी लावलेल्या नव्या नियमानुसार आता परदेशी नागरिकांना अमेरिकेचा व्हिसा मिळवण्यासाठी तब्बल एक लाख डॉलरच शुल्क मोजावं लागणार आहे. त्यामुळे शिक्षण वैद्यकीय क्षेत्र संशोधन नर्स त्याचबरोबर इतर तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी मोठा अडसर निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक राज्यांमधील आवश्यक सेवा धोक्यामध्ये येत आहेत.
त्यामुळे आता येणाऱ्या विरोधात 19 राज्य कोर्टात गेले आहे. यावर मॅसॅच्युएट्सच्या फेडरल कोर्टात सुनावणी होणार आहे. ही व्हिसाच्या वाढलेल्या शुल्क विरोधातील ही तिसरं आव्हान आहे. या अगोदर अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स आणि युनियन त्याचबरोबर आणि धार्मिक समूहाकडून याला आव्हान देण्यात आलं होतं.
