चीनने चंद्रावरून आणली दोन किलो माती; 6 महिने होणार अभ्यास, अमेरिकेलाही एन्ट्री पण..
China News : चीनचे अंतरीक्ष यानाने चांग ई ६ चंद्राच्या सुदूर क्षेत्रात प्रवेश (China News) करत तेथून दोन किलो माती पृथ्वीवर आणली आहे. चीनच्या या कामगिरीला (China Moon Mission) अंतरीक्ष क्षेत्रातील मोठी क्रांती म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. आता चंद्रावरून आणलेल्या या नमुन्यांची तपासणी केली जाणार असल्याचे चीनच्या अंतरीक्ष एजन्सीने स्पष्ट केले (Chang E 6) आहे. चीन जगातील एकमात्र असा देश आहे ज्याने चंद्राच्या सुदूर क्षेत्रात प्रवेश करत (Moon Mission) तेथे आपले यान उतरवले. यानंतर येथील माती आणि येथील डोंगरांवरील काही पदार्थांचे नमुने गोळा केले.
चीनच्या राष्ट्रीय अंतरीक्ष प्रशासनाने स्पष्ट केले आहे की या अभियानांतर्गत चंद्रावरून 1935.3 ग्रॅम नमुने एकत्रित करण्यात आले आहेत. संस्थेचे सहायक निर्देशक जी पिंग नुसार चंद्रावरून जे नमुने आणले गेले आहेत ते खास आहेत. आता या नमुन्यांवर विशेष अभ्यास केला जाणार आहे. या संशोधनासाठी चीनने जगभरातील शास्त्रज्ञांना बोलावले आहे. फक्त अमेरिकेसाठी चीनने विचित्र अट टाकली आहे.
अमेरिकेसह कोणतेही सहकार्य नासाबरोबर थेट द्विपक्षीय द्विपक्षीय सहकार्यावर बंदी घालणारा अमेरिकन कायदा काढून टाकण्यावर अवलंबून असेल असे चीनने म्हटले आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातील अंतरिक्ष सहकार्यातील सर्वात मोठा अडथळा वुल्फ संशोधनात आहे. जर अमेरिकेला खरंच सहकार्याची भूमिका घ्यावीशी वाटत असेल तर त्यांनी ही अडचण दूर करावी, असे चीनचे नॅशनल स्पेस अॅडमिनिस्ट्रेशनचे उपाध्यक्ष बियान झिगांग यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते.
सहा महिने सुरू राहणार अभ्यास
या नमुन्यांच्या अभ्यासावरुन चंद्राची निर्मिती कशी झाली याची माहिती मिळू शकते असे चिनी शास्त्रज्ञांना वाटते. जवळपास सहा महिने या नमुन्यांचे परीक्षण केले जाणार आहे. या दरम्यान जगभरातील शास्त्रज्ञांनाही आमंत्रित केले जाणार आहे. चांग ई 6 मंगळवारी पृथ्वीवर परतले. आतापर्यंत कोणत्याही देशाने चंद्राच्या ज्या भागात पाऊल ठेवले नाही त्या भागातून चांग ई 6 ने नमुने गोळा करून आणले आहेत. चीनचे हे अभियान पूर्णपणे यशस्वी झाल्याचे सांगण्यात आले. ई चांग 6 ला उत्तर चीनमधील सिविजांग भागात उतरविण्यात आले होते.
Moon Misson Isro : भारताची पुन्हा चंद्र मोहिम; जपानलाही सोबत घेऊन जाणार
53 दिवसांत चीनचं मिशन पूर्ण
या यानाला 3 मे रोजी चंद्राच्या दिशेने प्रक्षेपित करण्यात आले होते. 2 जून रोजी यान चंद्राच्या सुदूर क्षेत्रात उतरले होते. यानंतर 4 जूनला यानाने चंद्रावरील माती आणि आणखी काही नमुने गोळा करण्यास सुरुवात केली होती. या मिशनला पूर्ण होण्यासाठी 53 दिवस लागले. या यानाने चंद्राच्या अशा भागात पाऊल ठेवले जो भाग पृथ्वीपासून खूप दूर आहे. तसेच या भागात सूर्यकिरणे देखील पोहोचत नाहीत. आता या भागातील नमुन्यांतून महत्त्वाची माहिती मिळेल अशी शक्यता चिनी शास्त्रज्ञांना वाटत आहे.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नेतृत्वात चीनचा अंतरीक्ष कार्यक्रम वेगाने पुढे जात आहे. अमेरिका आणि रशियाला टक्कर देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. लष्करी उद्देशासाठी चीनचे हे अभियान असू शकते असा संशय अमेरिकेने व्यक्त केला आहे. आता 2030 पर्यंत चंद्रावर मानव मिशन पाठवण्याची तयारी चीनकडून केली जात आहे. तर अमेरिकाही 2026 पर्यंत मानव मिशन चंद्रावर पाठवण्याचे प्लॅनिंग करत आहे.