चीन-रशियाचं सिक्रेट ऑपरेशन अन् भडकला युरोप; 19 चीनी कंपन्यांवर कठोर निर्बंध

चीन-रशियाचं सिक्रेट ऑपरेशन अन् भडकला युरोप; 19 चीनी कंपन्यांवर कठोर निर्बंध

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन युद्धाचा (Russia Ukraine War) अजूनही निकाल लागलेला नाही. या युद्धात दोन्ही देशांचे अतोनात नुकसान झाले आहे. युद्ध थांबवण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न केले गेले मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. कारण या युद्धात युक्रेनला (Ukraine War) अमेरिकेसह युरोपीय देश मदत करत आहेत. युद्धासाठी आवश्यक लष्करी मदत आणि आर्थिक मदत मिळत असल्याने युक्रेन अजूनही लढण्याच्या स्थितीत आहे. तर दुसरीकडे रशियाला देखील (Russia) अमेरिकेच्या विरोधकांकडून छुपी मदत मिळत आहे. यामध्ये चीनचे नाव (China News) आघाडीवर आहे.

आताही असाच एक प्रकार समोर आला असून युरोपीय युनियनने (European Union) चीन विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. युरोपीय संघाने चीनच्या 19 कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत. युक्रेनमध्ये युद्धासाठी रशियाला हत्यारे पुरवठा करण्याचा आरोप या कंपन्यांवर ठेवण्यात आला आहे. युरोपीय संघाच्या अधिकृत जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत हाँगकाँग मधील (Hongkong News) काही कंपन्यांसह दोन दिग्गज ग्लोबल सटेलाईट कंपन्यांचा समावेश आहे.

China : चीनचा नवा ‘जीएसआय’ उद्योग, पाकिस्तानची चांदी; भारताला मात्र धोक्याची घंटा

चीनने मात्र सर्व आरोप निराधार असल्याचे म्हंटले आहे. रशियाच्या सैन्य मोहिमेचे आम्ही समर्थन करत नाही असे चीनने स्पष्ट केले आहे. प्रतिबंधाच्या या यादीत आणखी 61 कंपन्यांचा समावेश करण्यात आला आहे. आता या यादीत एकूण 675 कंपन्या आहेत. रशियाच्या संरक्षण आणि लष्करी अभियानात सहायभुत ठरतील अशा वस्तूंची विक्री करण्यावर कठोर प्रतिबंध टाकले आहेत. या कंपन्या कोणत्याही परिस्थितीत अशा वस्तूंची रशियाला विक्री करू शकत नाहीत.

ऑक्टोबर महिन्यात एएफपीने केलेल्या तपासणीत असे आढळून आले की रशियाच्या एका कंपनीने सन 2022 मध्ये दोन सॅटेलाईटची खरेदी आणि त्यांचे फोटो वापरण्यासाठी एका चीनी कंपनीबरोबर करार केला होता. सॅटेलाईट इमेज विक्री करणारी दुसरी कंपनी आहे जिला 2023 मध्ये अमेरिकेने निर्बधांच्या यादीत टाकले होते.

चीनने रशियाला थेट मदत केल्याचे दिसत नसले तरी अमेरिका आणि युरोपीय देश चीनवर रशियाला मदत केल्याचे आरोप सातत्याने करत असतात. चीनी विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जीयान यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. युरोपीय संघाच्या प्रतिबंधित कंपन्यांच्या यादीत ज्या 61 कंपन्यांचा समावेश करण्यात आला आहे त्यातील निम्म्या कंपन्या या रशिया आधारित आहेत. 19 चिनी कंपन्यांशिवाय यामध्ये तुर्कीच्या नऊ, किर्गिस्तानच्या दोन, भारताची एक तसेच काजकस्तान आणि यूएईच्या एका कंपनीचा समावेश आहे.

चीनच्या अल्टिमेटमनंतर पाकिस्तान घाबरला; ‘या’ खास ऑपरेशनने करणार CPEC सुरक्षित

follow us
  • fb
  • instagram
  • youtube