इराणचा नवा राष्ट्रपती कोण होणार? रईसींच्या निधनानंतर निवडणुकांची घोषणा

इराणचा नवा राष्ट्रपती कोण होणार? रईसींच्या निधनानंतर निवडणुकांची घोषणा

Iranian President Ebrahim Raisi : इराणचे राष्ट्रपती इब्राहीम रईसी यांचा हेलिकॉप्टर (Ebrahim Raisi) अपघातात मृत्यू झाला. यानंतर देशाचा राष्ट्रपती कोण असा प्रश्न उपस्थित होत असतानाच सरकारने राष्ट्रपती निवडणुका (Iran President Election) जाहीर केल्या आहेत. या निर्णयानुसार येत्या २८ जून रोजी निवडणूक होणार आहे. रिपोर्टनुसार, न्यायपालिका, सरकार आणि संसदेच्या प्रमुखांच्या बैठकीत निवडणुकीची तारीख निश्चित करण्यात आली. याआधी उपराष्ट्रपती मोखबर यांना कार्यवाहक राष्ट्रपती नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपराष्ट्रपती फक्त ५० दिवस सत्ता सांभाळू शकतात. या पन्नास दिवसांच्या काळात नव्या राष्ट्रपतीसाठी निवडणुका घ्याव्या लागतात.

रिपोर्टमध्ये म्हटले आहे की निवडणुकीत नोंदणी ३० मे ते ३ जून या मुदतीत होईल. यानंतर उमेदवार १२ ते २७ जून या कालावधीत प्रचार करू शकतात. आयआरएनएनुसार संवैधानिक परिषदेने प्रारंभिक रुपात या कार्यक्रमाला सहमती दर्शवली आहे. यानंतर आता देशात राष्ट्रपतिपदासाठी निवडणुका घेतल्या जाणार आहेत. यासाठी लवकरच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल.

इराणचे राष्ट्राध्यक्ष म्हणून वादग्रस्त कार्यकाळ! वाचा, कोण होते कट्टर धर्मगुरू इब्राहिम रईसी

इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचा मृत्यू रविवारी हेलिकॉप्टर अपघातात झाला. त्यांचे हेलिकॉप्टर उत्तर पश्चिम प्रांत पूर्व अजरबैजानच्या डोंगराळ भागात गायब झाले होते. सोमवारी सकाळी या हेलिकॉप्टरचा ढिगारा सापडला होता. या दुर्घटनेत राष्ट्रपतींसह विदेश मंत्र्यांचा मृत्यू झाल्याची खात्री करण्यात आली. शिन्हुआ वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार इरानच्या संविधानातील अनुच्छेद १३१ नुसार पदावर असताना राष्ट्रपतीचा मृत्यू झाला तर अशा वेळी सर्वात आधी उपराष्ट्रपतींना कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून जबाबदारी सांभाळावी लागते.

कोण आहेत इब्राहिम रईसी?

कट्टर पंथीय असलेले धर्मगुरू रईसी यांचा जन्म 1960 मध्ये पूर्वेकडील मशहद शहरात एका धार्मिक कुटुंबात झाला होता. खरं तर हा प्रदेश इराणच्या 1979 च्या इस्लामिक क्रांतीने प्रभावित झालेला होता. रईसी यांचे वडील मौलवी होते. रईसी केवळ पाच वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी वयाच्या 15 व्या वर्षी कौम शहरातील शिया संस्थेत शिक्षण घेण्यास सुरुवात केली. विद्यार्थीदशेत त्यांनी देशातील निदर्शनांमध्ये भाग घेतला होता.

Air Accident : फक्त रईसीच नाही, जगातील ‘या’ टॉप नेत्यांचाही विमान अपघातात मृत्यू..

रईसी यांच्या कार्यकाळात इराणचे इस्रायलशी आधीच असलेले संघर्षपूर्ण संबंध अत्यंत खराब झाले. इस्त्रायल-हमास युद्धाने आगीत आणखी भर टाकली आणि इराणचा पाठिंबा असलेल्या अनेक दहशतवादी गटांनी हमाससह इस्रायलवर हल्ले सुरू केले. इराणने ३०० हून अधिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागून पहिला थेट लष्करी हल्ला केल्यावर एप्रिलमध्ये दोन मध्य-पूर्व राष्ट्रांमधील तणाव वाढला. इराणी अधिकाऱ्यांनी हा हल्ला दमास्कसमधील देशाच्या दूतावासावर कथित इस्रायली हवाई हल्ल्याचा बदला म्हणून केला होता, ज्यात इराणी कमांडर मारले गेले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज