केनियात ‘ब्रेड’चा टॅक्स वाढला, लोकांचा थेट संसदेत मोर्चा; गोळीबारात दहा जणांचा मृत्यू

केनियात ‘ब्रेड’चा टॅक्स वाढला, लोकांचा थेट संसदेत मोर्चा; गोळीबारात दहा जणांचा मृत्यू

Kenya Parliament Protest : केनियामध्ये करात वाढ करणाऱ्या एका विधेयकाच्या विरोधात (Kanya Parliament Protest) प्रदर्शनकारी मंगळवारी थेट संसदेत घुसण्याचा प्रयत्न केला. येथे या लोकांनी चांगलाच राडा केला. संसदेच्या एका भागाला चक्क आग लावली. आंदोलकांचा आवेश पाहून सदनातील खासदार चक्क पळून गेले. याआधी सोमवारी सुद्धा प्रदर्शनकारी आणि सुरक्षा दलाच्या जवानांत धुमश्चक्री उडाली होती. या चकमकीत आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर 50 पेक्षा लोक जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे या आंदोलनात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची सावत्र बहिण औमा ओबामा देखील सहभागी झाली होती.

केनिया सरकारने ब्रेडवर 16 टक्के आणि वाहनांवर अडीच टक्के व्हॅट लावला आहे. सरकारच्या याच निर्णयाविरोधात आंदोलनकारी थेट रस्त्यावर उतरले आहेत. मंगळवारी प्रदर्शनकारी राजधानी नैरोबी मधील संसदेत घुसण्याचा प्रयत्न केला. येथे त्यांनी चांगलाच गोंधळ घातला. त्यामुळे घाबरलेले खासदार येथून पळून गेले. कर वाढीचे विधेयक संसदेत सादर करण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर लोक चांगलेच संतप्त झाले. यानंतर प्रदर्षणकारी नियंत्रणाबाहेर गेले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सदनातील खासदार घाबरले आणि येथून पळून गेले. काही खासदार मात्र अडकले त्यांना सुरक्षा रक्षकांनी बंदोबस्तात बाहेर काढले.

धक्कादायक! केनिया मारणार दहा लाख भारतीय कावळे; सरकारचा प्लॅनही अजब

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. त्यामुळे आंदोलक आणि पोलिसांत अनेक ठिकाणी झटापट झाली. या आंदोलकांची मागणी होती की खासदारांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान करावे. ही निदर्शने मागील दोन आठवड्यांपासून सुरू आहेत. पण मागील दोन दिवसांत या निदर्शनाना हिंसक वळण लागले. यावेळी सुरक्षाकर्मी आणि आंदोलकांत झालेल्या संघर्षात दहा जणांचा मृत्यू झाला तर 50 पेक्षा जास्त लोक जखमी झाले.

मानवाधिकार आयोगाचे राष्ट्रपतींवर ताशेरे

केनियाच्या मानवाधिकार आयोगाने अधिकाऱ्यांकडून प्रदर्शनकारी लोकांवर गोळ्या झाडतानाचा एक व्हिडिओ शेअर केला. केनियाच्या राष्ट्रपतींना उद्देशून मानवाधिकार आयोगाने म्हटले की जग तुम्हाला अत्याचाराकडे जाताना पाहत आहे. तुमच्या सरकारची कार्यपद्धती लोकशाहीवर हल्ला आहेत. गोळीबाराच्या घटनेत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सहभागी असणाऱ्या सर्व लोकांना जबाबदार धरले गेले पाहिजे अशी मागणी मानवाधिकार आयोगाने केली आहे.

केनियातून भारतात येणारे तब्बल 44 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, एकाला अटक

आंदोलकांनी राष्ट्रपती विलियम रूटो यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सीएनएनच्या रिपोर्टनुसार, या आंदोलनात केनियाई सामाजिक कार्यकर्त्या औमा ओबामा सहभागी होत्या. नैरोबीतील संसद भवनाबाहेरील प्रदर्शना दरम्यान त्यांच्यावरही अश्रूधूर सोडण्यात आला. आंदोलकांनी संसदेत घुसण्याचा प्रयत्न केला येथील काही भागाला आगही लावली. यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी आधी अश्रुधूर नंतर पाण्याचा मारा केला. तरीही काही उपयोग न झाल्याने गोळीबार केला. या गोळीबारात दहा लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

आंदोलकांच्या मागण्या काय ?

आंदोलकांनी सांगितले की आम्हाला संसदेचं कामकाज बंद करायचं आहे आणि प्रत्येक खासदाराने राजीनामा दिला पाहिजे. यानंतर येथे एक नवीन सरकार असेल. देशातील अन्य शहरांतही आंदोलने झाली. मोम्बासा, किसुमु आणि गरिसा या शहरांतही आंदोलक आणि पोलिसांत संघर्ष झाला. संसदेने एका वित्त विधेयकाला मंजुरी दिली असून हे विधेयक आता तिसऱ्या टप्प्यात आहे. यानंतर हे विधेयक राष्ट्रपतींकडे सहीसाठी पाठवण्यात येईल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube