आठव्या वंदे भारत ट्रेनला मोदी आज हिरवा झेंडा दाखवणार

आठव्या वंदे भारत ट्रेनला मोदी आज हिरवा झेंडा दाखवणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तेलंगणाला मोठी भेट देणार आहेत. सिकंदराबाद ते विशाखापट्टणमला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला पंतप्रधान आज हिरवा झेंडा दाखवतील. सिकंदराबाद ते विशाखापट्टणमला जोडणारी ही ट्रेन पोंगलच्या शुभमुहूर्तावर सुरू होईल.

या नवीन ट्रेनचे ऑपरेशन 16 जानेवारीपासून सुरू होईल, परंतु बुकिंग शनिवारपासूनच सुरू झाले आहे. दक्षिण मध्य रेल्वे (SCR) नुसार, विशाखापट्टणम-सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस पहाटे 5:45 वाजता सुटेल आणि 2:15 वाजता सिकंदराबादला पोहोचेल.

तर, सिकंदराबाद-विशाखापट्टणम ही ट्रेन सिकंदराबादहून दुपारी 3 वाजता सुटेल आणि रात्री 11.30 वाजता विशाखापट्टणमला पोहोचेल. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम, राजमुंद्री आणि विजयवाडा स्थानकांवर आणि तेलंगणातील खम्मम, वारंगल आणि सिकंदराबाद स्थानकांवर थांबे असतील.

ही ट्रेन भारतीय रेल्वेने सुरू केलेली आठवी वंदे भारत एक्सप्रेस असेल. सुमारे 700 किमी अंतर कापणारी ही ट्रेन तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन तेलुगू भाषिक राज्यांना जोडणारी पहिली ट्रेन असेल. वंदे भारत एक्स्प्रेस स्वदेशी डिझाइन केलेली आहे आणि ती अत्याधुनिक प्रवासी सुविधांनी सुसज्ज आहे आणि रेल्वे प्रवाशांना जलद, अधिक आरामदायी आणि अधिक सोयीस्कर प्रवास अनुभव देईल.

दरम्यान या निमित्ताने पंतप्रधानांचे कौतुक करताना केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, या दोन तेलुगू भाषिक लोकांना जोडणारी ही जागतिक दर्जाची ट्रेन उपलब्ध करून दिल्याबद्दल मी पंतप्रधान मोदींचे आभार मानतो.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube