नवी दिल्ली : 108 दिवसांच्या भारत जोडो यात्रेच्या पहिल्या विश्रांतीनंतर राहुल गांधी यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या समाधीवर जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. कन्याकुमारीपासून प्रवास करीत काँग्रेसची भारत जोडो यात्रा आता दिल्लीत पोहोचली आहे. अटलबिहारी वाजपेयींच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन राहुल गांधी यांनी नवी परंपरा सुरू केली. राहुल गांधी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी […]
कुलू : हिमाचल प्रदेशमधील कुलू-मनाली येथे पॅराग्लायडिंग दरम्यान पॅराशूटचा बेल्ट निसटून झालेल्या अपघातामुळं साताऱ्यातील तरुणाचा मृत्यू झालाय. अपघातात मृत्यूमुखी पडलेला तरुण सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथील आहे. सुरज शहा असं मृत तरुणाचं नाव आहे. तो 30 वर्षांचा होता. या घटनेमुळं शिरवळ शहरावर शोककळा पसरलीय. सुरजच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सुरज आपल्या मित्रांसह नाताळाची सुट्टी […]
काठमांडू: नेपाळमधील राजकीय घटनांच्या नाट्यमय वळणात सीपीएन-यूएमएल आणि इतर लहान पक्षांनी सीपीएन-माओवादी पक्षाचे अध्यक्ष पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ यांना पाठिंबा दिला आहे. ते नेपाळचे तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले आहेत. ते नेपाळचे पुढील पंतप्रधान असतील आणि सोमवारी (26 डिसेंबर) स्थानिक वेळेनुसार दुपारी 4 वाजता ते तिसऱ्यांदा नेपाळचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील.नेपाळमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर कोणत्याही राजकीय पक्षाला […]
नवी दिल्ली : आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ख्रिसमसचं औचित्य साधत देशबांधवांना ‘मन की बात’ कार्यक्रमातून संबोधित करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या आठवड्यात देशवासियांना त्यांच्या कल्पना पाठवण्याचं आवाहन केलं होतं. आज होणारा मन की बातचा कार्यक्रम यंदाचा म्हणजे 2022 वर्षातील शेवटचा भाग असणार असणार आहे. 2022 ची शेवटची ‘मन की बात’ या महिन्याच्या 25 […]
नवी दिल्ली : बर्फाचे वादळ अमेरिकेत पोहोचले आहे. या ‘बॉम्ब चक्रीवादळ’मुळे आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण यूएसमध्ये बर्फासह बर्फाळ वारे वाहत आहेत. या स्थितीत अमेरिकेत 5200 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारपर्यंत देशभरातील विमान कंपन्यांनी सुमारे 5200 यूएस उड्डाणे रद्द केली आहेत. त्यामुळे सुटीवर जाणाऱ्या हजारो नागरिकांची निराशा झाली आहे. […]
नवी दिल्ली : चीनमध्ये कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता भारतात खबरदारी घेण्यात येत आहे. सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर आता आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपासून प्रवाशांची कोरोना चाचणी आणि थर्मल स्क्रीनिंग होणार आहे. आजपासून हा नियम लागू करण्यात आला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला पाठवलेल्या पत्रात संगण्यात आले आहे की, इंटरनॅशनल विमानाने येणाऱ्या […]