आपण हिंदूंपेक्षा वेगळेच…मुलांना सांगायलाच हवं, पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी पुन्हा एकदा भारताविरुद्ध विष ओकले!

Pakistan Army Chief Asim Munir On Jinnah Two Nation Theory : पाकिस्तानचे (Pakistan) लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी पुन्हा एकदा विष ओकलंय. त्यांनी लष्करी आस्थापनेचं जुनंच गाणं (Jinnah Two Nation Theory) पुन्हा सादर केलंय. पाकिस्तानी लोकांना त्यांच्या मुलांना इस्लामिक रिपब्लिकच्या निर्मितीचा आधार म्हणून ‘हिंदू (Hindu) आणि मुस्लिमांत तीव्र फरक’ सांगण्यास सांगितलंय. यावेळी बोलताना मुनीर यांनी (Asim Munir) 1947 मध्ये पाकिस्तानची निर्मिती झालेल्या द्विराष्ट्र सिद्धांताचा उल्लेख केला.
असीम मुनीर यांनी म्हटलंय की, आपल्या पूर्वजांचा असा विश्वास होता की (India Pakistan) आपण जीवनाच्या प्रत्येक बाबतीत हिंदूंपेक्षा वेगळे आहोत. आपला धर्म वेगळा आहे. आपल्या चालीरीती वेगळ्या आहेत. आपल्या परंपरा वेगळ्या आहेत. आपले विचार वेगळे आहेत. आपल्या महत्त्वाकांक्षा वेगळ्या आहेत. हाच द्वि-राष्ट्र सिद्धांताचा पाया होता. तो आपण एक नाही, तर दोन राष्ट्रे आहोत या श्रद्धेवर तो रचला गेला होता, असं जनरल मुनीर म्हणाले आहेत.
तुम्ही तुमच्या मुलांना हे सांगायलाच हवे, जेणेकरून ते पाकिस्तानची कहाणी कधीही विसरणार नाहीत, असं आवाहन मुनीर यांनी काल अधिवेशनात भाषण देताना सांगितलं. 1940 च्या दशकात पाकिस्तानचे संस्थापक मुहम्मद अली जिना यांनी समर्थित केलेल्या द्वि-राष्ट्र सिद्धांतात असा युक्तिवाद केला होता की, मुस्लिम आणि हिंदू हे वेगळे राष्ट्र आहेत. या आधारावर जिना यांनी मुस्लिमांसाठी वेगळ्या मातृभूमीची आवश्यकता असल्याचे समर्थन केले. या विचारसरणीमुळे 1947 मध्ये ब्रिटिश भारताची फाळणी झाली अन् मुस्लिम बहुल राज्य म्हणून पाकिस्तानची निर्मिती झाली.
सोन्याने पहिल्यांदाच 95 हजारांचा टप्पा ओलांडला; खरेदी,विक्री की होल्ड करायचं? तज्ज्ञांचा सल्ला काय?
इस्लामिक रिपब्लिक म्हणून सुरुवात झालेल्या पाकिस्तानने हिंदूंसह अल्पसंख्याकांची काळजी घेण्याचे वचन दिले गेले. गेल्या काही दशकांमध्ये पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांची संख्या कमी झाली आहे. मुनीर दोन्ही समुदायांमधील फरकावर भर देत आहेत. ते पाकिस्तानचे सैन्य आपली राष्ट्रीय ओळख परिभाषित करण्यासाठी याचा वापर करत असल्याचं दिसतंय.
मुनीर यांना ‘हाफिज ए कुराण’ असेही म्हणतात. त्यांनी पाकिस्तानच्या स्थापनेच्या इस्लामिक तत्त्वांचा उल्लेख केला. म्हटलंय की देशाचा आधार कलिमा (इस्लामी श्रद्धेची घोषणा) वर ठेवण्यात आला होता. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सुधारणांवरील चर्चेदरम्यान काश्मीर मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केल्याबद्दल भारताने पाकिस्तानवर टीका केली होती. त्यानंतर काही दिवसांतच मुनीर यांनी हिंदू-मुस्लिम फूट पाडण्याबाबत वक्तव्य केलंय. त्यामुळं वातावरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे.