चीननेच केला पाकिस्तानचा गेम! गाठीभेटींचा देखावा पण, UN परिषदेत पाठिंबा दिलाच नाही; काय घडलं?

India Pakistan Crisis : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव प्रचंड (India Pakistan Tension) वाढला आहे. भारताने पाकिस्तान विरुद्ध कठोर निर्णय घेतले आहेत. भारत कधीही हल्ला करू शकतो अशी भीती पाकिस्तानला वाटत आहे. त्यामुळे भेदरलेल्या पाकिस्तानने थेट संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत धाव (United Nations Security Council) घेतली. येथे बंद दाराआड चर्चा झाली. परंतु, येथेही पाकिस्तानच्या नशिबी फजितीच होती. विशेष म्हणजे या बैठकीत पाकिस्तानचा मित्र चीनदेखील होता. पाकिस्तानला वाटत होते की जगाकडून सहानुभूती मिळेल पण सगळेच फासे उलटे पडले.
पहलगाम हल्ल्याच्या संदर्भात (Pahalgam Attack) या बैठकीत पाकिस्तानला टोचणारे सवाल विचारण्यात आले. या दरम्यान चीनही (China Pakistan) पाकिस्तानच्या मदतीला धावला नाही. चीनच्या मीडियानेही पाकिस्तानच्या समर्थनात चकार शब्दही काढला नाही. पाकिस्तानसाठी ही स्थिती अधिक त्रासदायक ठरली आहे. भरवशाचा मित्र म्हणून ज्या देशाचं कौतुक पाकिस्तानी राज्यकर्ते करत होते त्याच चीनने पाकिस्तानला असा जोरदार दणका दिला आहे.
पाकिस्तानचा मोठा निर्णय, डिफेन्स बजेटमध्ये केली 18 टक्यांनी वाढ; जूनमध्ये येणार बजेट
चीननेच पाकिस्तानला दिला धक्का
पाकिस्तान सध्या चीनचं नाव घेऊन जास्त आक्रमकता दाखवत आहे. भारताच्या विरोधात चीन पाकिस्तानबरोबर आहे असे चित्र पाकिस्तानी मीडियाकडून रंगवले जात आहे. सोमवारी राष्ट्रपीत असीफ अली जरदारी यांनी चीनचे राजदूत जियांग जोदोंग यांची भेट घेतली. यावेळी जोदोंग यांनी सांगितले की दक्षिण आशियात शांती आणि स्थिरता राखण्यासाठी चीन नेहमीच पाकिस्तानचे समर्थन करील.
पाकिस्तानचे सरकारी ब्रॉडकास्ट रेडियो पाकिस्तान नुसार चिनी राजदूताने चीन आणि पाकिस्तान यांच्यात मैत्रीच्या संबंधांचे वर्णन केले आहे. परंतु, चीननेच यात ट्विस्ट आणला आहे. एकीकडे चीन पाकिस्तानला द्विपक्षीय समर्थनचा भरवसा देत आहे तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला पाठिंबा देण्यात टाळाटाळ करत आहे.
युएनएससीच्या बैठकीत पाकिस्तानला कोणत्याच देशाकडून सहानुभूती मिळाली नाही. उलट येथे पाकिस्तानची फजितीच झाली. येथेही चीनने पाकिस्तानला पाठिंब्याचा एकही शब्द उच्चारला नाही. क्लोज डोअर मिटींगमध्ये सदस्य देशांनी पाकिस्तानकडून पसरवल्या जात असलेल्या खोट्या नरेटिव्हला धुडकावून लावले. बैठकीनंतर एकाही देशाने कोणतेही निवेदन किंवा कोणताही प्रस्ताव दिला नाही. पाकिस्तानसाठी हा खूप मोठा धक्का होता.
मास्टरस्ट्रोक ठरला तोट्याचा! भारताची विमानं बंद, पाकिस्तानला दररोज अडीच कोटींचा फटका