मोठी बातमी! युक्रेनचा रशियात घुसून हल्ला; ‘या’ भागात आणीबाणी घोषित
Russia Ukraine War : मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया युक्रेन (Russia Ukraine War) युद्धात अघटीत घडलं आहे. ज्याची कुणीच कल्पना केली नसेल अशी गोष्ट घडली आहे. युक्रेनने पहिल्यांदाच रशियात घुसून आक्रमण केलं आहे. मागील दोन दिवसांपासून गोळीबार सुरू आहे. युक्रेनने रशियातील अनेक ठिकाणांना हत्यारबंद वाहने आणि टँकच्या मदतीने वेढा घातला आहे. रशियानेही प्रत्युत्तरास सुरुवात केली आहे. या घडामोडींनंतर रशियातील कुर्स्क भागात आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांनी (Vladimir Putin) फेब्रुवारी 2022 मध्ये युक्रेन विरोधात युद्ध पुकारल्यानंतर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला असल्याचे सांगितले जात आहे.
मिडिया रिपोर्ट्सनुसार कुर्स्क भागात भीषण युद्धाला सुरुवात झाली आहे. या भागाचे कार्यवाहक गव्हर्नर अॅलेक्सी स्मिरनोव यांनी सांगितले की या भागात घुसखोरी केलेल्या शत्रूचा प्रभाव कमी करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. युक्रेनचे सैन्य मागील दोन दिवसांपासून येथे हल्ले करत आहे. जवळपास एक हजार युक्रेनी सैनिकांनी मंगळवारी सकाळी घुसखोरी केल्याचा दावा रशियाने केला आहे. यातील शंभर सैनिकांना मारण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
..तर युक्रेनच्या अडचणी नक्कीच वाढणार
युक्रेनला आता अमेरिकेत होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकांची चिंता लागून राहिली आहे. डोनाल्ड ट्रम्प जर विजयी झाले तर युक्रेनच्या अडचणी वाढू शकतात. कारण अमेरिका पहिल्यासारखी मदत करू शकणार नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच सांगितलं होतं की जर सत्तेत आलो तर रशिया युक्रेन युद्ध मिटवू. युद्धातील ताज्या घडामोडींवर अमेरिकेने प्रतिक्रिया दिली आहे. या हल्ल्याबाबत आमच्याकडे कोणतीच माहिती नाही. या हल्ल्याचं कारण जाणून घेण्यासाठी आम्ही युक्रेने सेनेशी संपर्क साधत आहोत, असे अमेरिकेने स्पष्ट केले.
गॅसचा पुरवठा होणार बंद
या युद्धाचा परिणाम गॅस पुरवठ्यावर होऊ शकतो. युक्रेनच्या ऊर्जा मंत्र्यांनी सांगितले की सुदजा (Sudzha) माध्यमातून गॅस ट्रांझिट अजूनही काम करत आहे. याच परिसरातून नैसर्गिक वायूचा पुरवठा केला जातो. या युद्धानंतर अनेक युरोपीय देशांनी रशियाकडून गॅस मागणीत कपात केली आहे. ज्याचा फटका रशियाला बसला आहे. ऑस्ट्रिया मात्र रशियाकडूनच गॅस खरेदी करत आहे. सुदजा भागात भीषण युद्ध सुरू असल्याने युरोपात ट्रांझिट फ्लो अचानक बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Russia China : चीन-रशियाकडून ‘डॉलर’ हद्दपार! द्विपक्षीय व्यापारासाठी तयार केला खास प्लॅन