PM मोदींसाठी रशियाची मोठी घोषणा; मोदींच्या दौऱ्यावेळी युक्रेन राहिलं ‘सेफ’
Vladimir Putin on PM Narendra Modi Ukraine Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी काल युक्रेन दौऱ्यावर होते. भारत हा रशियाचा मित्र देश. त्यात रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू. अशा परिस्थितीत मित्र देशाच्या पंतप्रधानाने युक्रेनचा दौरा करावा आणि यावर रशियाची प्रतिक्रिया काय असेल याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. मात्र रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी घेतलेल्या भूमिकेने सारेच अचंबित झाले. जोपर्यंत पीएम मोदी अमेरिकेत आहेत तोपर्यंत रशिया युक्रेवर हल्ला करणार नाही अशी घोषणा पुतिन यांनी केली होती. विशेष म्हणजे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन युक्रेन दौऱ्यावर असतानाही रशियाने युक्रेनवरील मिसाइल हल्ले थांबवले नव्हते.
भारताने आम्हाला पाठिंबा द्यावा, अन् रशियाकडून तेल खरेदी थांबवावी; झेलेन्स्कींची मोदींना साद
पंतप्रधान नरेंद्र मोदी पोलंडचा दौरा आटोपून काल युक्रेनमध्ये दाखल झाले होते. येथे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी मोदींचे स्वागत केले. बऱ्याच कालावधीनंतर भारतीय पंतप्रधानांचा हा यु्क्रेन दौरा होता. त्यामुळे अमेरिकेसह जगाच्या नजरा या दौऱ्याकडे होत्या. मोदी काय बोलणार याचीही उत्सुकता होती. मोदींनीही जगाला अपेक्षित असेच वक्तव्य केले. युद्धा हा शांततेचा मार्ग नाही. दोन्ही देशांतील युद्ध आता थांबायला हवे.
HUGE 🚨 Vladmir Putin decides that as long as PM Modi is in Ukraine, there will be no att@ck.
Vladimir Putin declares this as a mark of respect for PM Modi.
Meanwhile, ZeIenskyy praised PM Modi & said he is grateful for humanitarian aid packages India has provided throughout… pic.twitter.com/kOXLSkE8d7
— Times Algebra (@TimesAlgebraIND) August 23, 2024
युक्रेन संघर्ष समाप्त करण्यासाठी एकमेव मार्ग आहे तो म्हणजे संवाद. भारताने नेहमीच शांततेचा मार्ग स्वीकारला आहे. भारत शांती आणि प्रगतीच्या मार्गात सक्रिय भूमिका बजावण्यास तयार आहे. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार करारावर सह्या केल्या. या दौऱ्याचे अमेरिकेने कौतुक केले होते. तर रशियाची काय प्रतिक्रिया असेल याची उत्सुकता होती. रशियाची अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आली नसली तरी काल रशियाने एक मोठा घेतला होता. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान मोदी जोपर्यंत युक्रेनमध्ये आहेत तोपर्यंत रशिया युक्रेनवर एकही हल्ला करणार नाही अशी घोषणा केली होती.
भारत युक्रेन-रशिया युद्धाला थांबवू शकतो PM मोदींच्या भेटीनंतर पोलंडच्या पंतप्रधानांनी सांगितलं
मोदी-झेलेन्स्की गळाभेटीवर प्रश्न, जयशंकर यांनी पत्रकाराला केलं गप्प
पंतप्रधान मोदींनी युक्रेनची राजधानी कीव येथे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांची भेट घेतली. आधी त्यांच्याशी हस्तांदोलन केले नंतर झेलेन्स्कींची गळाभेट घेतली. परंतु, काही जणांना मोदींची ही कृती पटली नाही. यावरूनही त्यांच्यावर टीका केली जात आहे. एका पत्रकाराने विदेश मंत्री एस. जयशंकर यांना याबाबत प्रश्न विचारला. त्यावर जयशंकर यांनी त्या पत्रकाराला जशास तसे उत्तर दिले.
त्या पत्रकाराला भारतीय संस्कृती काय असते हेही सांगितलं. गळाभेट घेणं आमच्या संस्कृतीचा एक भाग आहे. आम्ही आपल्या माणसांशी अशाच पद्धतीनं भेटत असतो असे जयशंकर म्हणालो. आमच्याकडे ज्यावेळी लोक एकमेकांना भेटतात त्यावेळी एकमेकांची गळाभेट घेतात. ही गोष्ट तुमच्या संस्कृतीचा भाग नसेल पण मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो की हा आमच्या संस्कृतीचा भाग नक्कीच आहे.