Suspect in Charlie Kirk’s assassination in custody, says Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, चार्ली कर्कचा मारेकरी पकडला गेला आहे. अमेरिकेतील ‘उटाह व्हॅली युनिव्हर्सिटी’च्या कॅम्पसमध्ये बुधवारी (दि. 10) झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान कर्क यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. कर्क हे ट्रम्प (Donald Trump) यांच्या अगदी जवळच्या सहकाऱ्यांपैकी एक होते. फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी कर्क यांच्या अगदी जवळच्या व्यक्तीने आरोपीला अटक केल्याचाही दावा केला आहे.
Trump says 'with a high degree of certainty' that suspect in Charlie Kirk killing has been caught, reports AP. pic.twitter.com/Jvfb1lVpw0
— Press Trust of India (@PTI_News) September 12, 2025
कर्क यांची हत्या नेकमी कशी झाली?
चार्ली उटाह राज्यातील उटाह व्हॅली विद्यापीठात एका कार्यक्रमाला संबोधित करत होते. त्यावेळी अचानक एका व्यक्तीने त्यांच्यावर गोळी झाडली. गोळी कर्क यांच्या मानेला लागल्याने ते जमिनीवर कोसळले. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने चार्ली यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
चार्ली यांच्या हत्येसाठी कट्टरपंथी डावे जबाबदार
चार्ली यांच्या हत्येनंतर अमेरिकेच्या (America) राष्ट्राध्यक्षांनी या घटनेबाबत एक व्हिडिओ संदेश जारी केला होता. ज्यात त्यांनी कर्कच्या हत्येसाठी “कट्टरपंथी डाव्या” पक्षांना जबाबदार धरले आहे. ज्यांनी ही हत्ये घडवली त्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नसल्याचा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे. चार्लीच्या हत्येमुळे प्रत्येकजण दुःखाने आणि संतापाने भरलेला आहे. चार्ली यांनी स्वातंत्र्य, लोकशाही, न्याय आणि अमेरिकन लोकांसाठी लढा दिल्याचे ट्रम्प यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
‘अंडरवेअर इंडेक्स’ अन् ‘लिपस्टिक इफेक्ट’; अर्थव्यवस्थेतल्या मंदीचं गुढ उकलणारी खरी नाडी…
जंगलात सापडले हत्यार
ज्या रायफलने कर्क यांची हत्या करण्यात आली ती रायफल एफबीआयने जप्त केली आहे. हे शस्त्र गुन्ह्याच्या ठिकाणाजवळील जंगलात फेकलेले आढळले. आढळून आलेल हे हत्यार एक उच्च-शक्तीची बोल्ट-अॅक्शन रायफल असून, अशा रायफल्स अत्यंत अचूक निशाणा साधण्यासाठी वापरल्या जातात असे एफबीआय अधिकारी रॉबर्ट बोहल्स यांनी सांगितले.
माऊसर .३०-०६ रायफलवर संशय
न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, हे शस्त्र कदाचित जुने माऊसर मॉडेलचे असावे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ते आयात केलेले माऊसर .30-06 बोल्ट-अॅक्शन रायफल असू शकते. तपासकर्त्यांना रायफलच्या चेंबरमधून एक वापरलेले काडतूस आणि इतर बुलेट्स सापडल्या आहेत. या प्रकारची रायफल बहुतेकदा निशानेबाजी आणि शिकारीसाठी वापरले जाते.