लॉस एंजेलिस भस्म करणाऱ्या आगीला कुणीच का नियंत्रित करू शकत नाहीये?
Wildfires Rage Near Los Angeles America : अमेरिका सध्या भीषण आगीच्या विळख्यात (Fire In Los Angeles) सापडलाय. लॉस एंजेलिसच्या जंगलात भीषण लागलेली थेट रहिवासी परिसरात पोहोचलीय. या वणव्यामुळे आणीबाणी देखील घोषित करण्यात आली आहे. या वणव्यात एक हजारांहून अधिक इमारती जळून खाक झाल्यात. पण ही आग आटोक्यात का (Fire In America) येत नाहीये? अमेरिकेच्या या भागात दरवर्षी भीषण वणवे का पेटतात? असे अनेक प्रश्न पडत आहेत.
अमेरिकेच्या कॅलिफोर्निया प्रांतातील लॉस एंजेलिसच्या अनेक जंगलात आग लागली आहे. सर्वात आधी पॅसिफिक पॅलिसेड्सच्या जंगलात वणवा भडकला. नंतर तो वेगात पसरला. या वणव्याने नंतर इटन आणि हर्स्टच्या जंगलांनाही कवेत (Wildfires Rage Near Los Angeles America) घेतलं. आता लीडिया, वुडली आणि सनसेट या आसपासच्या जंगलातही आग पसरली. इतकंच नाही तर हॉलीवूड हिल्समध्येही आगीचं तांडव सुरू आहे. या आगीने शेकडो एकर परिसरातील जंगलं नष्ट झालीत. येथील सगळाच परिसर जळून खाक झालाय. लॉस एंजेलिस प्रशासनाने संपूर्ण शहरात आणीबाणी लागू केलीय.
अठरा एकर परिसरात आगीचे लोळ
अमेरिकेत सात जानेवारीपासून पेटलेले वणवे आटोक्यात आणता येत नाहीये. हजारो लोकांना घरं सोडून पळं काढावा लागलाय, तर अनेकांचा जळून कोळसा झालाय. ही आग किती मोठी आहे, हे पाहण्यासाठी नासाच्या एका विभागाने अवकाशातून फोटो काढले. अडीच दिवसांत या आगीचे लोळ अठरा एकर परिसरात पसरले आहेत. अन् अजून वाढतच चालली आहे. ही आग नेमकी कशी लागली? ती नियंत्रणापलीकडे का गेली? अजून हा वणवा आटोक्यात का येत नाहीये. असे अनेक प्रश्न पडत आहेत.
मी काय त्यांच्यासारखा रिकामटेकडा आहे का? फडणवीसांचा निशाण्यावर नक्की कोण..
अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरच्या कॉलिफोर्निया राज्याच्या दक्षिणेला लॉस एंजेलिस शहर आहे. हॉलीवूड, बेवेर्ली हिल्स, सॅंटामोनिका या सगळ्या जागा आपल्याला सिनेमा आणि सिरीजमध्ये ऐकू येतात. त्याच लॉस एजेंलिसमध्ये आहेत. या भागात अनेक हॉलिवडू स्टार्सची घरं आहेत. इथेच 7 जानेवारी रोजी पहिल्यांदा आग लागली. वेगाने वाहणारे वारे आणि कोरडा परिसर यामुळे ही आग पाहतापाहता पसरली. जोपर्यंत जोराने वाहणारे वारे थांबत नाही, तोपर्यंत ही आग आटोक्यात आणणं अशक्य असल्याचं लॉस एंजेलिस शहरातील अग्मिशमन दलाने सांगितलंय. पॅलिसेंड्स, इटन या दोन वणव्यांसह सात वणवे लॉस एंजेलिसमध्ये सध्या पेटलेले आहेत. जगप्रसिद्ध हॉलिवूड हिलला देखील आगीनं घेरलंय.
आग का आटोक्यात येत नाहीये?
कॅलिफोर्नियासाठी जंगलात वणवे लागणं, हे काही नवीन नाही. पण या वेळी आग इतकी का पसरली? ही सर्व आग जास्त लोकसंख्या असलेल्या भागात पसरली आहे. आगीचं स्वरूप इतकं भीषण आहे की, आग नियंत्रणात आणण्यासाठी पुरेशी यंत्रणा देखील उपलब्ध नाहीये. दुसरं म्हणजे शंभर ते दीडशे किलोमिटर वेगाने वाहणारे वारे. कॅलिफोर्नियाच्या आतल्या भागामधून थंड आणि कोरडी हवा घेवून वाहणाऱ्या वाऱ्यांना सॅंटाअॅनाविंड्स असं म्हटलं जातं. याच वाऱ्यांमुळं आग वाढत असल्याचं समोर आलंय. म्हणूनच या वाऱ्यांना डेव्हिल विंड्स म्हटलं जातं.
…तरच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर ‘मोक्का’ टिकेल; वकील माजिद मेमन काय म्हणाले?
गेलं दशकभर कॅलिफोर्नियामध्ये दुष्काळ होता. साधारण दोन वर्षांपूर्वी परिस्थिती बदलायला सुरूवात झाली होती. झाडझुडपं वाढत होती, पण कॅलिफोर्नियातील गेला उन्हाळा मात्र भयानक होता. त्यानंतर मात्र पुरेसा पाऊस न पडल्यानं ही झाडं कोरडी पडली होती. याच झाडांनी आत आग पसरावयला हातभार लावल्याचं दिसतंय. महत्वाचं म्हणजे अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर लाडकाची घरं असतात. कारण तिथे जंगल मोठ्या प्रमाणावर आहेत. लाकूड सहज अन् स्वस्त उपलब्ध होतं. जास्त थंडी असलेल्या भागात अशी घरं उबदार ठरतात. परंतु वणवे लागताच ही घरं नष्ट देखील होतात. आता तर तिथं वणवे विझवायला पुरेसे घरं देखील नाहीये.
कॅलिफोर्नियातील कोरड्या, उष्ण वातावरणामागे हवामान बदलाचा मोठा हात असल्याचं तज्ज्ञ सांगतात. या भागांत फायर वेदर डे नावाची एक संकल्पना आहे. म्हणजे असे दिवस की, आर्द्रता कमी असते, तर वारे वेगाने वाहत असतात. म्हणजे वणवा लागण्यासाठी पोषक वातावरण या काळात असतं. या दिवसांची संख्या मागील काही काळात मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. थंडीत पाऊस पडला तर वणव्यांचे सावट काहीसं कमी होतं. परंतु यावेळी ऑक्टोबरमध्ये असा पाऊस पडलेलाच नाही. त्यामुळं अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर वणवे पेटत आहेत.