मोठी बातमी! इराकमधील शॉपिंग मॉलला भीषण आग, 50 जणांचा होरपळून मृत्यू

मोठी बातमी! इराकमधील शॉपिंग मॉलला भीषण आग, 50 जणांचा होरपळून मृत्यू

Iraq Fire Break Out : इराकमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथील एका शॉपिंग (Iraq Fire Break out) मॉलमध्ये आग लागून 50 लोकांचा होरपळून मृत्यू झाला आहे. एएफपी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार ही घटना इरामधील एका सुपर मार्केटमध्ये घडली. या आगीचे व्हिडिओ आणि फोटा सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. या फोटोत इमारतीच्या मोठ्या भागाला आग लागल्याचे स्पष्ट दिसत आहे. धुराचे लोटही दिसत आहेत.

या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यात एक पाच मजली इमारत आगीच्या विळख्यात सापडलेली दिसत आहे. अग्निशमन विभागाचे कर्मचारी आग आटोक्यात आणताना दिसत आहे. वासित प्रांताच्या गव्हर्नरांनी माध्यमांना माहिती देताना सांगितलं की, एक मोठ्या शॉपिंग सेंटरला आग लागली. यात मत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या 50 झाली आहे.

मोठी बातमी! रायलसीमा एक्सप्रेस अन् हिसार एक्सप्रेसच्या डब्यांना आग, अग्निशमन दल दाखल

तीन दिवसांचा शोक जाहीर 

ही घटना कशामुळे घडली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. आयएनएनुसार गव्हर्नरने सांगितले की या घटनेची चौकशी सुरू असून सुरुवातीचे परिणाम दोन दिवसांच्या आत जाहीर केले जातील. एक हायपर मार्केट आणि एक रेस्टॉरंटमध्ये आग लागली होती. यावेळी लोक वस्तू खरेदी करत होते तर काही लोक जेवण करत होते. अग्निशमन विभागाने आगीत अडकलेल्या लोकांना वाचवले तसेच आगही आटोक्यात आणली. या घटनेमुळे देशभरात तीन दिवसांचा शोक जाहीर करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सध्या येथे मदतकार्य वेगाने सुरू करण्यात आले आहे. जखमी लोकांना अॅम्ब्यूलन्सद्वारे दवाखान्यात भरती केले जात आहे. एएफपीनुसार हा मॉल पाच दिवसांपूर्वीच उघडला होता. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आग लागल्याचे सुरुवातीच्या तपासातून स्पष्ट झाले आहे. याआधी सन 2023 मध्य इराकमध्येच एका लग्न सोहळ्यादरम्यान मोठी दुर्घटना घडली होती. भीषण आगीत तब्बल 100 लोकांचा होरपळून मृत्यू झाला होता. तर 150 लोक जखमी झाले होते.

Iran Vs Israel : अरब, मंगोल ते इराकपर्यंत, इराणचा इतिहास रक्तपाताने भरलेलाच 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube